जिल्हा विशेष प्रतिनिधी सुनिल धुर्वे
यवतमाळ : ‘३०० कोटी वृक्षारोपण अभियान २०२६-२७’ अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात यंदा २० लाख वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. सामाजिक वनीकरण विभागाच्या पुढाकारातून विविध शासकीय विभागांना स्वतंत्र लक्ष्य देण्यात आले आहे.
शासकीय जागा, रस्त्यांच्या दुतर्फा, शाळा-महाविद्यालय परिसरासह योग्य ठिकाणी वृक्षलागवड केली जाणार असून, लागवडीनंतर रोपांच्या संगोपनावरही भर दिला जाणार आहे. नागरिक, सामाजिक संस्था व विविध संघटनांनी या मोहिमेत सहभागी होऊन वृक्षसंवर्धनासाठी योगदान द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
