मच्छिंद्र पार्डी तांडा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपदी निलेश राठोड

 







श्रीक्षेत्र माहूर : माहूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मच्छिंद्र पार्डी तांडा 1 येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी निलेश तुळशीराम राठोड उपाध्यक्ष प्रियंका किशोर चव्हाण यांची आज दि.17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी निवड करण्यात आली आहे.

              आज गुरुवारी दि. 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मच्छिंद्र पार्डी तांडा  येथे प्रतिष्ठित नागरिक,पालक, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत शालेय व्यवस्थापन समिती गठीत करण्यात आली आहे.

              नूतन समिती पुढील प्रमाणे  अध्यक्ष निलेश तुळशीराम राठोड, उपाध्यक्ष प्रियंका किशोर चव्हाण, सदस्य सुरेश खिमा राठोड ग्रामपंचायत सदस्य शिक्षण तज्ञ सुदर्शन जोगराम नाईक, वरिष्ठ विद्यार्थी विनय बळीराम राठोड, अंगणवाडी सेविका नंदाबाई देवराव पवार, आशा वर्कर चित्रलेखा दत्ता चव्हाण, निलेश राठोड, सदस्य वर्षा नितेश पवार, सदस्य प्रियंका दिनेश राठोड, सदस्य मिलन समाधान राठोड, सदस्य ललिता विश्वजीत चव्हाण, विद्यार्थी प्रतिनिधी मोहित निलेश राठोड, व पदसिद्ध सचिव रंजना दत्तराव कौसडीकर यांची निवड करण्यात आली आहे.

             यावेळी माजी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप उत्तम राठोड, माहूर शिवसेना तालुका संघटक सुशील जाधव, ग्रामसेवक संदेश आडे यांच्यासह पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार धनंजय गिऱ्हे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post