राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)च्या माहूर तालुका अल्पसंख्याक विभागाच्या तालुकाध्यक्षपदी शेख तुराब अली शेख रहीम यांची निवड करण्यात आली आहे.
नांदेड जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर यांच्या हस्ते शेख तुराब अली शेख रहीम यांना नियुक्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेसकडून विविध पदांवर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने शेख तुराब अली शेख रहीम यांच्यावर माहूर तालुका अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
नियुक्तीनंतर बोलताना शेख तुराब अली शेख रहीम यांनी पक्षाच्या ध्येयधोरणानुसार काम करत अल्पसंख्याक समाजातील नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि माहूर तालुक्यात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट)चे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित होते.

