पारवा पोलिसांचा गणेश मंडळांना शिस्तीचा मंत्र!

 



तालुका प्रतिनिधी निजामोद्दिन सोलंकी 

मो- 99222 58228

यवतमाळ,घाटंजी : आगामी गणेशोत्सव व गोपाळकाला उत्सव शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी पारवा पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिस पाटील तसेच गणेश मंडळांच्या अध्यक्ष व सदस्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विविध महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.

रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत ध्वनिक्षेपक वाजवू नयेत, तसेच डीजे आणि लेझर लाईटचा वापर पूर्णपणे टाळावा, अशा स्पष्ट सूचना पोलिसांनी दिल्या. मंडप परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित ठेवण्यासह २४ तास स्वयंसेवकांची नियुक्ती करण्याचे निर्देशही देण्यात आले.

गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीदरम्यान धार्मिक किंवा सामाजिक तेढ निर्माण करणारे वादग्रस्त देखावे टाळावेत. आगमन व विसर्जन मिरवणुकीत गुलालाऐवजी फुलांचा वापर करावा. तसेच गणेशमूर्तीची उंची पाच फुटांपर्यंतच ठेवावी, अशा सूचना देण्यात आल्या.

विसर्जनासाठी अरुंद रस्त्यांमधून सहज जाता येईल अशाच वाहनांचा वापर करावा. पर्यावरणपूरक व सामाजिक उपक्रमांवर भर देत राज्यस्तरीय आदर्श गणपती मंडळ स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहनही करण्यात आले.

बैठकीस पारवा पोलिस ठाण्याचे पोलिस पाटील तसेच विविध गणेश मंडळांचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते. 

 "गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी संजयनगर पोलिसांचे गणेश मंडळांना मार्गदर्शन"

Post a Comment

Previous Post Next Post