तीन महिन्यांपासून नवीन नियुक्त्या नाही
श्रीक्षेत्र माहूर : आदिवासी बहुल व दुर्गम भौगोलिक परिस्थिती असलेल्या तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रमुख आधार असलेल्या माहूर येथील ग्रामीण रुग्णालयातील मनुष्यबळाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींपैकी तब्बल ४२ ग्रामपंचायती पैसा क्षेत्रात येत असून, या भागातील आदिवासी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी ग्रामीण रुग्णालय हे अत्यंत महत्त्वाचे आरोग्य केंद्र आहे. मात्र, आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने या रुग्णालयाची आरोग्यसेवा सध्या व्हेंटिलेटर’वर पोहचली आहे
रुग्णालयात डॉक्टरां नंतर रुग्णांची प्रत्यक्ष सेवा, औषधोपचार, देखभाल अधिपरिचारिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते परंतु माहुर येथिल ग्रामीण रुग्णालयात अधिपरिचारिकांची एकूण ७ पदे मंजूर असताना, त्यापैकी ५ अधिपरिचारिकांच्या प्रशासकीय बदल्याचे आदेश दि. ८ जून रोजी उपसंचालक, आरोग्य सेवा, परिमंडळ लातूर यांनी काढले या बदल्यांना तीन महिन्यांचा कालावधी उलटत आला तरी माहूर ग्रामीण रुग्णालयातील रिक्त झालेल्या पदांवर अद्याप एकाही अधिपरिचारिकेची नियुक्ती करण्यात आलेली नाही ? त्याचा थेट परिणाम आदिवासी बहुल भागातील रुग्णसेवेवर होत असल्याचे भयान वास्तव आहे तर काही वेळा चक्क रुग्णांना उपचाराविना परतण्याची वेळ ओढावत आहे माहुर हे तालुक्याचे ठिकाण असले तरी येथे अध्यावत रुग्णालय नसल्याने रुग्ण
मोठ्या अपेक्षेने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयातचा अधार घेत असतात
मात्र, आवश्यक मनुष्यबळाअभावी रुग्णांना वेळेवर सेवा मिळण्यात अडचणी निर्माण होत असल्याच्या अनेक तक्रार रुग्णांच्या नातेवाईकांकडून केली जात आहे हे जिल्हा प्रशासनास माहीत नाही असे नाही पण या कडे का दुर्लक्ष केले जाते याचे कोडे उलगडत नाही तरी आवश्यक मनुष्यबळाअभावी प्रत्यक्ष रुग्णसेवेची अवस्था ‘उपरसे झकपक, अंदरसे भकभक’अशी परीस्थिती होऊन बसली असताना आरोग्यसेवेचा कणा असलेली अधिपरिचारिका पदे रिक्त ठेवून रुग्णालयाचा कारभार किती दिवस चालणार ? दुर्गम व आदिवासीबहुल भागातील नागरिकांनी उपचारासाठी कुठे जावे ? तर उपसंचालक आरोग्य सेवा परीमंडळास लातुर यांना माहुरचे ग्रामीण रुग्णालय बंद पाडण्याचा डाव तर नाही ना ? असा सवाल आता रुग्णांच्या नातेवाईकांकडून उपस्थित केले जात आहेत.
माहूर ग्रामीण रुग्णालयातील पाच अधिपरिचारिकांच्या बदल्या केल्यानंतर त्यांच्या जागी तब्बल तीन महिने नवीन नियुक्त्या न करणे, हा केवळ प्रशासकीय विलंब आहे की ग्रामीण रुग्णालयाची सेवा कमकुवत करण्यामागे काही वेगळे षडयंत्र तर परीक्रामा यात्रा काळात अतिरीक्त नियुक्त डॉक्टर यांनी केवळ औपचारिकता केली तर असाच प्रकार मागच्या परीक्रमा यात्रा काळात देखील झाला होता.
रुग्ण कल्याण समिती सदस्य
अनिल वाघमारे

