घाटंजीतील केजीएन इलेक्ट्रिक अँड फर्निचरच्या गोदामाला भीषण आग; शॉर्टसर्किटमुळे ४२ लाखांचे नुकसान Massive fire breaks out at KGN Electric and Furniture warehouse in Ghatanji; Loss of Rs 42 lakhs due to short circuit



यवतमाळ : घाटंजी शहरातील आंबेडकर वॉर्ड परिसरात असलेल्या केजीएन इलेक्ट्रिक अँड फर्निचरच्या गोदाम व दुकानाला गुरुवारी मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री अचानक गोदामातून धूर व आगीच्या ज्वाळा दिसू लागल्याने नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत गोदामातील इलेक्ट्रिक साहित्य, फर्निचर व इतर माल पूर्णपणे जळून खाक झाला होता.

या आगीत अंदाजे ४२ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची फिर्याद मजिद सलमान नवशाद अली (वय ३६), रा. गुरुदेव वॉर्ड, घाटंजी यांनी दिली आहे.

प्राथमिक तपासात आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Post a Comment

Previous Post Next Post