माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन; जनमाहिती अधिकारी व प्रथम अपील अधिकाऱ्यांवर ₹25 हजार दंडाची मागणी

RTI Chandrapur collector Chandrapur


जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूरकडून गटविकास अधिकारी, पंचायत समिती चिमूर यांना चौकशी व नियमानुसार कारवाईचे निर्देश

चंद्रपूर | प्रतिनिधी

माहितीचा अधिकार (RTI) कायद्यांतर्गत माहिती न दिल्याप्रकरणी संबंधित जनमाहिती अधिकारी व प्रथम अपील अधिकारी यांच्यावर ₹25 हजार दंड तसेच शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती चिमूर यांना प्रकरणाची चौकशी करून नियमानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

11 नोव्हेंबर 2024 रोजी जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, अर्जदार पंचशिल वाळके यांनी केलेल्या तक्रारीची चौकशी करून आवश्यक ती कार्यवाही करावी व त्याचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

या पत्रामुळे संबंधित प्रकरणाची अधिकृत स्तरावर दखल घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. आता गटविकास अधिकारी चौकशीनंतर कोणती कार्यवाही करतात आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कोणता अहवाल सादर करतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post