लेखक.श्री.तानाजी सखाराम कांबळे
8080532937
सांगली जिल्ह्यातील विधान परिषदेचे विद्यमान आमदार तथा रयत शेतकरी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत सध्या खूपच 'अस्वस्थ'आहेत. मध्यंतरी त्यांनी काश्मिरी फाईल्स नावाचा चित्रपट बघून आपण खूपच अस्वस्थ झाल्याची प्रतिक्रिया दिली होती. तर नुकतीच दोन दिवसांपूर्वी दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलकांना 'दहशतवादी' असल्याचे त्यांनी संबोधून आपण खूपच अस्वस्थ आहे अशी प्रतिक्रिया दिली होती.
खडकी कोंबडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कडकनाथ कोंबड्यांच्या घोटाळ्यापासून ते सदाभाऊंच्या वरती '"आमची काय बायांची लफडे "असतील तर ते सांगा ?
असा आरोप करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलेल्या आरोपामुळे ते कधी अस्वस्थ झालेले दिसून आले नाहीत.
एखाद्याची "चाटूकरता" खुश मस्करी किती करावी याचेही काही 'प्रमाण' असते.
"नीट पेपर फुटी" मुळे देशभरातील विद्यार्थ्यांच्या चाललेल्या आंदोलनाला देशभरातून मोठ्या प्रमाणात मिळत असलेला पाठिंबा पाहून आमदार सदाभाऊ खोत यांची झालेली ''घुसमट" पाहता शेतकरी संघटनेच्या आंदोलनातून तयार झालेले सदाभाऊ सारखे नेतृत्व, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना जेव्हा दहशतवादी म्हणून संबोधते तेव्हा सदाभाऊ यांची वैचारिक पातळी किती घसरली आहे याचे साक्षी प्रमाण घ्यायला काही ज्योतिषाची गरज लागत नाही.
सांगली जिल्हा वसंत दादा पाटलांचा वैचारिक वारसा ठरवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र त्या सांगली जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या विरुद्ध विचारांची "पैदास "होणे येणाऱ्या भविष्यात काळामध्ये धोक्याची घंटा ठरू शकते.
संगत ही माणसाला बिघडवत असते.
मग ती जात भाईंच्या असो,समुदायाचे असो,वा राजकारणाचे असो.एकदा का त्या चा वाण नाही पण गुण लागला की माणूस,त्या संगतीचे विचार आत्मसात करावयास लागतो.आणि मग सत्तेच्या साठमारीमध्ये त्याची मूळ विचारधारा बदलू लागते.
अर्थातच जेव्हा जबाबदार माणसं
अशा पद्धतीचे भाष्य करू लागतात,
आपल्या मूळ विचारधारेला फारकत देतात,आपल्या संघर्षमय जीवनाला "फाट्यावर" बसवतात तेव्हा,त्यांना नसलेल्या जखमेवरती फुंकर घालून भाष्य करण्याची,सवय जडून लागते.
बिघडलेल्या" संगतीतून"समर्थनाची प्रतिक्रिया देणारे,आपल्या मूळ विचारधारेची फारकत घेऊन,
आपल्या मनातील "अस्वस्थता "समाज माध्यमांमधून व्यक्त करणारे,यांची येणाऱ्या काळातील भविष्यातील वाटचाल कोणत्या दिशेने असू शकते,तिचा सामाजिक चळवळी वरती,कितपत परिणाम होऊ शकतो याचा अंदाज बांधणे आज रोजी कठीण झाले आहे.
सन 2014 ते 19 च्या तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस सरकारच्या काळातील राज्यमंत्री असलेले,विधान परिषदेचे विद्यमान आमदार श्री.सदाभाऊ खोत यांची ओळख पश्चिम महाराष्ट्रातील साखर पट्ट्याला शेतकऱ्यांचा लढाऊ नेता अशी आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा "डावा डोळा" म्हणून त्यांच्याकडे तत्कालीन काळातील शेतकरी चळवळी अनेक वर्षे बघितले गेले होते.
वारणा नदी तीरावरच्या पैलतीरावरती संथपणे वाहणाऱ्या पाण्याच्या काठावरती वसलेल्या सांगली जिल्ह्यातून सदाभाऊ खोत विधान परिषदेला प्रतिनिधित्व करतात.शेतकरी चळवळीत काम करता करता तोंडात असणारी "रांगडी" भाषा,बोलण्यातील असणारे प्रभुत्व,
हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या शेतकरी समुदायाला जागेवरती खिळवून ठेवणारा सदाभाऊ खोत यांचं रांगड्या शैलीतील भाषण अंगाला दरदरून घाम फोडणारे ठरतात.शरीरातील सारी इंद्रिय जागे होतात.
वैतागलेल्या त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या मनाला असं वाटू लागतं की,सदा भाऊंच भाषण संपल्या संपल्या,इथल्या साखर सम्राटाला जाऊन खरंच 'चोप द्यावा'
शेती शेतकरी अर्थव्यवस्थेला गुलाम बनवणारा या अनेकांना,हिरव्यागार शेत मळ्यातील उसाच्या 'कांडक' याने मारावे असा काहीसा संचार सदाभाऊ खोत यांचे भाषण सुरू झाल्यानंतर ते संपेपर्यंत शेतकरी बांधवांच्या मना मनामध्ये रेंगाळू लागतो.
एका भाषणांमध्ये सदाभाऊ खोत असं म्हणतात की,शेतकऱ्याची शेती शेतकरी अर्थव्यवस्था समजून घ्यावयाचे असेल तर खऱ्या अर्थाने कलेक्टरला पाच सहा गाई-म्हशी सांभाळायला द्यायला पाहिजेत.तालुक्याच्या तहसीलदारला दहा-बारा शेळ्या-मेंढ्या सांभाळायला द्यायला पाहिजे.त्याशिवाय शेतकऱ्याची दुखणी काय आहेत हे प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांना समजून येणार नाही.सदाभाऊ यांच्या वरील भाषणातील गांभीर्य खूप गंभीर आहे.
शेतकरी हा खूप त्रस्त झालेला आहे कर्जबाजारी झालेला आहे आर्थिक अडचणीत सापडलेला आहे.शेती शेतकरी आणि अर्थव्यवस्था या साखळीच्या मधील दलाल यांनी शेतकऱ्यांच्या शेतातून निघणार्या शेती उत्पादित मालाला स्थिर हमीभाव देण्याऐवजी अस्थिर करण्याचा प्रयत्न नेहमीच केला गेला आहे.शेतकऱ्याच्या शेतातील
मजुरी पासून नांगरटी पर्यंत ते खते बी-बियाणे,यास्तवविज बिल पाणी बिल प्रतिवर्षी विविध ऋतूप्रमाणे येणारी नैसर्गिक संकटे,आणि त्यातून त्याच्या शेती उत्पादित मालाला मिळणारा हमीभाव याच्या अर्थकारणाचा ताळमेळआज देखील मांडला जात नाही.किंबहुना तो दडवून ठेवला जातो.
उसाचा एक टन तीन हजार रुपये ला पश्चिम महाराष्ट्रातील साखर पट्ट्यातील कारखाने देतात.
मात्र एका टनाचे पैसे खताच्या एका पोत्याला द्यावे लागतात इतके प्रचंड प्रमाणात खतांचे दर वाढलेले आहेत.
शेती अर्थव्यवस्था व अर्थकारण खूप विस्कळीत झालेले आहे.अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध शेतकरी संघटना व या संघटनेचे प्रमुख नेता मंडळी कार्यकर्ते यांनी,आपल्या मूळ विचाराशी इमानेइतबारे प्रामाणिक राहिले पाहिजे.
शेती व शेतकरी याला कोणताही जात धर्म रंग नसतो.त्यांना उगाचच कट्टर हिंदुत्ववादाचे लेबल लावणे अतिशय चुकीचे आहे.आपल्या मूळ विचारधारेशी आपण फारकत घेत आहोत याची जबाबदारी पूर्वक भान असणे देखील गरजेचे आहे.
सत्तेच्या साठमारीत शेतकरी चळवळीचे नेतृत्व करता करता आपण कोणत्या विचाराच्या,आहारी राजकीय सत्तेच्या साठमारीत मध्ये चाललो आहोत याचे भान आमदार सदाभाऊ खोत यांनी ठेवणे खूप गरजेचे आहे.
अलिकडच्या काळातील त्यांची काही वक्तव्ये पाहता,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ओळख असणारी,खाकी वर्दी पांढरा शर्ट व हाफ चड्डी [नागपूर येथील संघाच्या रेशीम बागेतूननुकतेच हाफ चड्डी चे फुल पॅन्ट मध्ये रुपांतर करण्यात आलेले आहे.]व हतात लांबसडक सागवानी काठी घेऊन गोपीचंद पडळकर यांचे सारखा फोटो काढावयाचे राहिलेले आहेत.
अर्थात सध्या ते विचाराने भाजपशी
झाले असल्यामुळेच,त्यांच्या तोंडून हिंदुत्ववादाचा ची विखारी भाषा सद्यस्थितीत येऊ लागली आहे.
देशभरातील "साडेतीन टक्के" ब्राह्मण संख्येने ओळखले जातात.यापैकी दक्षिण व उत्तर भारतामध्ये,व देशभरातील विविध प्रादेशिक राज्यांमध्ये
ब्राह्मण संख्या अधिक प्रमाणात आढळली जाते.काश्मीर मध्ये पांडित्य ब्राह्मण असणारे विविध पंडित कदाचित संख्येने साडेतीन टक्के असावेत.
काश्मीर मध्ये कट्टरपंथीय मुस्लिम दहशतवादी यांनी तेथील काही पंडितांच्या केलेल्या हत्या वरती निघालेला चित्रपट,काश्मीर फाईल या नावाने
,विविध कारणाने वादग्रस्त ठरत आहे.मात्र चित्रपटाला लोकप्रिय ठरत आहे असा भास दाखवला जातो.काश्मीर पंडित ब्राह्मण्य या शेंडी वाल्यांच्या हत्या झाल्याच्या प्रसंग पडद्यावर ती पाहून
सदा भाऊंना खूप तीव्र वेदना होतात.त्यांना चित्रपट ग्रहांमध्ये ओक्साबोक्शी रडावे अशी वाटते.चित्रपटातील काही प्रसंग त्यांना बघू नयेत असे वाटते.
चित्रपटातील पंडित ब्राह्मण यांचा कट्टर पर्वतीय मुस्लिम दहशतवाद्यांनी केलेला छळ,सदाभाऊ खोत यांना अस्वस्थ करून सोडतो. आणि त्यांच्या मनात देशाविषयी चा हिंदुत्ववादाचा अभिमान जागा होतो.
हिंदू म्हणून जन्माला आलो आणि हिंदू म्हणूनच मरणार आहे अशी तेच शपथ या चित्रपटगृहांमध्ये घेऊन बाहेर पडतात.इतका "परिणाम" हिंदू पंडितांच्या हत्या झाल्याचे चित्रपटातील काही प्रसंग बघून सदाभाऊ खोत यांच्या मनावरती झालेला आहे.मात्र,सुप्रसिद्ध नाटक "
तो मी नव्हेच"! या नाटकातील निपाणीचा तंबाखूचा व्यापारी लखोबालोखंडे,
सारखी भूमिका,अनेक जण करू लागलेली आहेत.
साडेतीन टक्के पंडित ब्राह्मण यांच्याविषयीसहानुभूती बाळगत असताना,महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावर ती केलेल्या आत्महत्या,सदाभाऊ खोत यांना दिसून येत नाहीत का.महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये सावकारी पाशात अडकलेले अनेक शेतकरी,व त्यांच्या लुटल्या गेलेल्या शेतजमिनी सदाभाऊंना दिसून येत नाहीत का.
शेतकऱ्यांच्या विस्कळीत झालेली अर्थव्यवस्था खते बी-बियाणे कीटकनाशके यांचे गगनाला भिडलेले महागाईचे दर,शेती उत्पादित मालाला मिळत नसलेला स्थिर भाव सदाभाऊ खोत यांना दिसून का येत नाही.
शेतकऱ्याला बँका दारात उभा करून घेत नाहीत कर्ज देण्यासाठी.विज भारनियमन पासून ते कॅनॉल मध्ये नसलेल्या रिकाम्या पाण्याअभावी ओसाड माळरानावर ची रिकामी पडलेली शेत जमीन भाजपवासी झालेल्या सदाभाऊ खोत यांना दिसून येत नाही का?
ऋतुमानाप्रमाणे दरवर्षी येणारी नैसर्गिक संकटे व त्याचे शेतीवर ती होणारे दूरगामी परिणाम,यातून बिगडत जाणारी शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था,शेतकऱ्यांच्या पोराला नोकरी मिळत नाहीत पूर्ण शिक्षण घेतलेले असतानादेखील.शेतकऱ्याच्या पोराला नोकरी नसल्या कारणाने पोरगी देखील लग्न कराय साठी मिळत नाही.आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना अशी वाईट परिस्थिती शेतकऱ्यांची झालेली असताना,
अस्वस्थ झालेले सदाभाऊ खोत,
यांना हिंदुत्ववादाचा ची शपथ घ्यावी लागते,हा त्यांच्या वैचारिक जडणघडणीमध्ये झालेला बदल असून,ढवळ्याशेजारी पवळ्या बांधला वाण नाही पण गुण लागला.
अशी काहीशी म्हण सदाभाऊ खोत
यांना लागू पडते.
नाहीतरी बाजूला "वंचित" पवळा एक बसलेला आहे.बिरोबाच्या "खोट्या शपथा" घेऊन सत्तेच्या साठमारीत मध्ये "जातीसाठी माती खाणारा" आणि
अशा अनेक ढवळ्या पवळ्या ना घेऊन,साडेतीन टक्क्यांचे हिंदुत्वाचे गोडवे गाणारे,नागपूर येथील संघाच्या रेशीम बागेतून,एक डेरी फार्म चा गोठा बांधतील,आणि अशा अनेक ढवळ्या पवळ्या ना त्या ठिकाणी,हिंदुत्ववादी विचाराने बांधून ठेवतील.
राजकारणातील सत्तेचा वाटा यांना खायला देतील मात्र,यांच्या गळ्यातील दोरीचा "लगाम" मात्र त्यांच्या हातात नक्की ठेवतील.माणसाची मूळ विचारधारा बदलली की गुलामाच्या 'गुलामगिरीची' प्राथमिक लक्षणे अशा विविध प्रसंगातून दिसून येतात याला सदाभाऊ खोत अपवाद असतीलच असे नाही.
सांगली जिल्ह्यातील विधान परिषदेचे विद्यमान आमदार तथा रयत शेतकरी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत सध्या खूपच 'अस्वस्थ'आहेत. मध्यंतरी त्यांनी काश्मिरी फाईल्स नावाचा चित्रपट बघून आपण खूपच अस्वस्थ झाल्याची प्रतिक्रिया दिली होती. तर नुकतीच दोन दिवसांपूर्वी दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलकांना 'दहशतवादी' असल्याचे त्यांनी संबोधून आपण खूपच अस्वस्थ आहे अशी प्रतिक्रिया दिली होती.
खडकी कोंबडी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कडकनाथ कोंबड्यांच्या घोटाळ्यापासून ते सदाभाऊंच्या वरती '
"आमची काय बायांची लफडे "
असतील तर ते सांगा ?
असा आरोप करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केलेल्या आरोपामुळे ते कधी अस्वस्थ झालेले दिसून आले नाहीत.
एखाद्याची "चाटूकरता" खुश मस्करी किती करावी याचेही काही 'प्रमाण' असते.
नीट पेपर फुटी मुळे देशभरातील विद्यार्थ्यांच्या चाललेल्या आंदोलनाला देशभरातून मोठ्या प्रमाणात मिळत असलेला पाठिंबा पाहूनआमदार सदाभाऊ खोत यांची झालेली ''घुसमट" पाहता शेतकरी संघटनेच्या आंदोलनातून तयार झालेले सदाभाऊ सारखे नेतृत्व, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना जेव्हा दहशतवादी म्हणून संबोधते
तेव्हा सदाभाऊ यांची वैचारिक पातळी किती घसरली आहे याचे साक्षी प्रमाण घ्यायला काही ज्योतिषाची गरज लागत नाही.
सांगली जिल्हा वसंत दादा पाटलांचा वैचारिक वारसा ठरवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र त्या सांगली जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीच्या विरुद्ध विचारांची "पैदास "होणे येणाऱ्या भविष्यात काळामध्ये धोक्याची घंटा ठरू शकते.

