आषाढी एकादशीनिमित्त से. फ. ला. हायस्कूलमध्ये विठुरायाचे आकर्षक चित्र रेखाटन

Gavakadachibatmi



जिल्हा प्रतिनिधी  | निलेश रामगावकर 

अमरावती धामणगाव रेल्वे: आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त से. फ. ला. हायस्कूल, धामणगाव रेल्वे (जि. अमरावती) येथे भक्तिमय वातावरणात विठ्ठलभक्तीचा अनोखा संदेश देण्यात आला. विद्यालयाचे कला शिक्षक तथा चित्रकार अजय जिरापुरे यांनी विद्यालयाच्या दर्शनी फलकावर विठुरायाचे आकर्षक चित्र रेखाटून विद्यार्थ्यांसह नागरिकांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.

Amaravati, dhamangav railway


यावेळी त्यांनी वारकरी संप्रदायाची भक्ती, समता आणि एकात्मतेची परंपरा अधोरेखित करत, आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख असल्याचे सांगितले. चंद्रभागेच्या तीरावर लाखो वारकऱ्यांच्या भक्तीभावातून समाजातील ऐक्य, प्रेम आणि मानवतेचा संदेश जगभर पोहोचतो, असेही त्यांनी नमूद केले.

विद्यालयाच्या दर्शनी फलकावरील विठुरायाचे रेखीव चित्र विद्यार्थ्यांसह नागरिकांचे लक्ष वेधून घेत असून, उपस्थितांनी या कलाकृतीचे कौतुक केले. या उपक्रमामुळे विद्यालय परिसरात आषाढी एकादशीचा भक्तिमय आणि उत्साहपूर्ण माहोल निर्माण झाला.

Post a Comment

Previous Post Next Post