गावाकडची बातमी साठी आजचं आमच्या प्रतिनिधीशी संपर्क साधा..
घाटंजी | प्रतिनिधी : शिक्षण क्षेत्रातील कथित भ्रष्टाचार संपवून शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता निर्माण व्हावी, तसेच पर्यावरण व देशहिताच्या विविध प्रश्नांवर आवाज उठविणारे समाजसेवक सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी घाटंजी तालुक्यात जाहीर आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या आंदोलनात घाटंजी तालुक्यातील सर्व सुजाण नागरिक, पालक, विद्यार्थी आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. शिक्षण क्षेत्राला लागलेली भ्रष्टाचाराची वाळवी नष्ट करण्यासाठी लोकांनी एकत्र येऊन लोकशाही मार्गाने आवाज उठविण्याची गरज असल्याचे आयोजकांनी नमूद केले आहे.
हे आंदोलन सोमवार, दिनांक 20 जुलै 2026 रोजी सकाळी 11.00 वाजता, घाटंजी येथे आयोजित करण्यात आले असून, समाजहिताच्या या उपक्रमात सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

