मालेगावच्या सर्पमित्र अतुल श्रीराम शर्मा यांची कहाणी

 


19 वर्षे, 2000+ सापांना जीवदान! तरीही उपेक्षित!!



जिल्हा प्रतिनिधी, कैलास बनसोड 

मालेगाव, वाशिम: 2007 पासून आजतागायत गेली 19 वर्षे  मालेगाव येथील शसर्पमित्र अतुल श्रीराम शर्मा हे जीवाची पर्वा न करता सापांना वाचवण्याचे काम करत आहेत.

वनविभाग, वाशिम यांच्याकडे नोंदणीकृत सर्पमित्र असले अतुल शर्मा यांनी आतापर्यंत *2000 हून अधिक* विषारी आणि बिनविषारी सापांना रेस्क्यू करून जंगलात सुरक्षितरीत्या सोडले आहेत. घर, शाळा, शेत, मंदिर अशा कोणत्याही ठिकाणी साप दिसला की ते मध्यरात्रीही धावून जातात.


"साप मारू नका, आम्हाला फोन करा" असा संदेश ते गेली 19 वर्षे गावोगावी देत आहेत. त्यामुळेच या भागात सापदंशाच्या घटना लक्षणीयरीत्या कमी झाल्या आहेत.



परंतु धक्कादायक बाब म्हणजे एवढी मोठी सेवा करूनही अतुल शर्मा यांना शासनाकडून आजपर्यंत कोणतेही *मानधन, रेस्क्यू किट किंवा सन्मान* मिळालेला नाही. फक्त जनसेवेच्या भावनेतून ते हे काम करत आहेत.

ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे की वनविभाग, वाशिम आणि मालेगाव नगरपंचायतीने अतुल शर्मा यांच्या 19 वर्षांच्या सेवेची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहनपर मानधन आणि "वन्यजीव मित्र" पुरस्काराने सन्मानित मानधन देण्याची नागरिकांतून मागणी जोर धरतं आहे 


Malegaon Maharashtra India wasim



Post a Comment

Previous Post Next Post