पाच वर्षांचा वाद संपला; गंगाजळीतील वादग्रस्त नालीचे काम अखेर पूर्ण
अन्यायग्रस्त नागरिकांनी मानले ग्रामसेवक गजानन काळमेघ यांचे आभार
जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर
धामणगाव रेल्वे: मागील ५ वर्षांपासून गंगाजळी गावात काही बौद्ध समाजातील नागरिकांचे सांडपाणी हे रस्त्यावर येत असल्याने त्यावर उपाय म्हणून तत्कालीन गटविकास अधिकारी माया वानखडे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाणी उतार भागाने काढण्यासाठी सांगितले होते. मात्र गावातील काही जातीयवादी नीच प्रवृत्तीच्या लोकांकडून आमच्या घरासमोरून सुद्धा नाली खोदायची नाही म्हणून विरोध केला. विरोध केल्याने पुढाकार कोण घेणार म्हणून तत्कालीन ग्रामसेवक सागर बिजवे यांनी सदर नालीचे काम हे उतार भागाने न करता उलट दिशेने चढ भागाने केली. त्यासाठी २ लक्ष रुपये खर्च करण्यात आला मात्र चढ भाग असल्याकारणामुळे सांडपाणी जाणे शक्य नसल्याने परिस्थिती जैसे तेच निर्माण झाली होती. सातत्याने होत असलेल्या त्रासामुळे अन्यायग्रस्त नागरिकांनी पंचायत समिती कार्यालयात आंदोलन केले असताना त्यावर पुन्हा उतार भागाने नाली काढण्यासाठी ग्रामविकास अधिकारी याना सांगण्यात आले.
ग्रामसेवक गजानन काळमेघ यांच्या तटस्थ भूमिकेमुळे अखेर त्या नालीचे बांधकाम झाले पूर्ण
१५ वित्त आयोगामधून परत २ लक्ष रुपयांचे नियोजन करून नालीचे काम सुरु करीत असताना विरोध म्हणून पुन्हा गावातील नीच प्रवृत्तीच्या काही लोकांकडून इतर लोकांच्या घरी जाऊन त्यांचे माथी भडकवण्याचे काम करण्यात आले. आणि नालीला विरोध दर्शविला. मात्र ग्रामपंचायत जळगाव आर्वी येथील ग्रामसेवक गजानन काळमेघ यांनी तटस्थ भूमिका घेत विरोध करणाऱ्याला आपल्या भाषेत तसदी देत सदर नालीचे काम हे शासकीय जागेमध्ये होत असताना नियमानुसार सुरु आहे त्यामुळे कामात अडथडा निर्माण केल्यास त्याच्याविरुद्ध पोलीस तक्रार करण्यात येईल म्हणून ठणकावून सांगितले. ग्रामसेवक गजानन काळमेघ यांनी घेतलेल्या तटस्थ भूमिकेमुळे त्या नालीचे बांधकाम पूर्ण झाले.
अन्यायग्रस्त नागरिकांनी मानले ग्रामसेवकाचे आभार
गावातील काही लोकांचा जाणीवपूर्वक सातत्याने विरोध होत असताना प्रशासनाकडून ग्रामसेवक गजानन काळमेघ यांनी घेतलेल्या तटस्थ भूमिकेमुळे अखेर त्या वादग्रस्त नालीचे बांधकाम पूर्णत्वास गेल्याने ३ घरातील सांडपाण्याच्या प्रश्न कायमचा सुटला. त्यामुळे नागरिकांनी ग्रामसेवकाचे आभार मानले...
गावातील काही मनुवादी विचारसरणीच्या लोकांनी नालीला केलेल्या विरोधामुळे आमच्या घराचे सांडपाणी रस्त्यावर साचत होते. नाली नसल्यामुळे पावसाळ्यात तेच पाणी घरात शिरत असल्याने नाहक त्रास सहन करावा लागला. मात्र ग्रामसेवक गजानन काळमेघ यांनी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत मागील अनेक वर्षांपासून होत असलेल्या त्रासापासून आम्हाला मुक्त केले..
सुरज उत्तम वानखडे - गंगाजळी नागरिक
