महा. अनिसचे अमरावती जिल्हा कार्याध्यक्ष प्रफुल्ल कुकडे यांना "लक्ष्यवेधी कार्यकर्ता २०२६" पुरस्कार

 


     जिल्हा प्रतिनिधी,निलेश रामगावकर 

अमरावती : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने अमरावती जिल्हा कार्याध्यक्ष प्रफुल्ल कुकडे यांना त्यांच्या समाजप्रबोधन व अंधश्रद्धा निर्मूलन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत "लक्ष्यवेधी कार्यकर्ता २०२६" हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

दि. ०६ जून २०२७ रोजी आयोजित समारंभात  सुभाष वारे यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला. यावेळी सुभाष लोमटे व  माधव बावगे  (राज्याध्यक्ष) यांची प्रमुख उपस्थिती होती, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय बनसोडे (राज्य कार्याध्यक्ष) होते.



पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रफुल्ल कुकडे यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, मार्गदर्शक आणि सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. हा सन्मान समाजातील अंधश्रद्धेविरोधातील लढा आणि समाजप्रबोधनाचे कार्य अधिक जोमाने पुढे नेण्याची प्रेरणा देणारा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

– प्रफुल्ल कुकडे

जिल्हा कार्याध्यक्ष, महा. अनिस, अमरावती

Post a Comment

Previous Post Next Post