संगमनेर येथे "संविधान अमृत महोत्सव आणि राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२६" हा ऐतिहासिक सोहळा संपन्न

 



Secondary School Talegaon Dashasar Amravati


 अहिल्यानगर प्रतिनिधी| संगिता मिसाळ 

  अहिल्यानगर : तेजस सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ रविंद्र विठ्ठल घोसाळे यांच्या संकल्पनेतून गुरुवार दिनांक ४ जून २०२६ रोजी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संगमनेर भूमीत मालपाणी लॉन्स या ठिकाणी "संविधान अमृत महोत्सव आणि राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२६" हा महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यातून उपस्थित असलेल्या स्वाभिमानी आंबेडकरी अनुयायी च्या स्मरणात राहील असा ऐतिहासिक भव्य दिव्य सोहळा संपन्न झाला. या प्रेरणादायी कार्यक्रमात संविधानाच्या ७५ वर्षा निमित्त अनेक इतिहास प्रसिद्ध कुटुंबांच्या वारसदारांसह संपूर्ण महाराष्ट्रातील ७५ बौद्ध उपासक उपासिकांना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. डॉ ए सुमेध बोधीजी,राष्ट्रीय महासचिव भिक्खू संघ चैत्यभूमी दादर भारतीय बौद्ध महासभा यांनी धम्म संस्कारमय वातावरणात अत्यंत सुंदर पद्धतीने कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ बाबासाहेब आंबेडकरांसोबत ज्यांनी आयुष्यभर कार्य केले ते राज्याचे माजी मंत्री दादासाहेब रुपवते यांचे सुपुत्र ज्येष्ठ कायदे तज्ञ संघराज रुपवते साहेब होते. प्रमुख व्याख्याते: प्रा.मुकुंद भारसाकळे (प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ,लेखक,व्याख्याते आणि सामाजिक कार्यकर्ते) यांनी "डॉ. बाबासाहेब आंबेडकर व समाज उत्कर्षाची मूलतत्वे" या विषयावर महत्वपूर्ण व्याख्यान दिले. उद्घाटक राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेबांच्या हस्ते व प्रमुख अतिथी डॉ किरण लहामटे, आमदार अकोले विधानसभा त्याचप्रमाणे डॉ रविंद्र घोसाळे आणि संगमनेर तालुक्याचे ज्येष्ठ आंबेडकरी नेते माणिकराव यादव, अकोले तालुक्यातील व राज्याचे ज्येष्ठ आंबेडकरी नेते विजयराव वाकचौरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.


          सर्वच मान्यवरांनी संविधानाबद्दल अनमोल मार्गदर्शन केले. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते सुर्यकांत शिंदे यांनी नाशिक पदवीधर संघाचे माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य केले. उद्योजक कल्पित वाकचौरे, मुंबई येथील उद्योजक डॉ ज्ञानेश्वर अहिरे,प्रा.डॉ कल्पना सांगोडे,प्रा.गंगाधर लांडगे, तसेच संविधान समिती मधील ज्येष्ठ आंबेडकरी नेते सुरेशराव देठे, विनय घोसाळे , के. जी. भालेराव ,अगस्ती बनसोडे, हरिदास मोकळ ,अमोल कदम, रवि रुपवते , सचिन साळवे, प्रा डॉ प्रकाश वाघमारे, बापू बोरसे, भारती आमराव, गायत्री रामटेके, प्रवीण रुपवते, ॲड.प्रियांका संगारे, डॉ प्रेरणा भोसले, लहानु निळे ,उपसभापती बाळासाहेब गायकवाड, सुधाकरराव रोहम , ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मी तुपसुंदर,सुनंदा सोनवले , डॉ देविदास गायकवाड, सिद्धार्थ तलवारे, सिने अभिनेते भिमसेन चव्हाण, बालकदास खोब्रागडे, सुधाकर दारोळे , श्रीधर गायकवाड, कवी अशोक शिंदे, महेंद्र कांबळे, नानासाहेब मोरे , गौतम पगारे, रमेश जगताप ,पत्रकार आनंद गायकवाड व जयप्रकाश पवार तसेच हा संपूर्ण कार्यक्रम तेजस घोसाळे आणि भूषण घोसाळे या दोघांनी अद्यावत टेक्नॉलॉजीचा उपयोग करून कार्यक्रमात सुसूत्रपणा निर्माण करून कार्यक्रमाची उंची वाढवली. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतिश खरात सरांनी अत्यंत मार्मिक पद्धतीने करून सर्वच उपस्थितांची मने जिंकून घेतली.

Post a Comment

Previous Post Next Post