लिटिल लोटस इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलनामाचा गजर; परिसर भक्तिमय

 

Talegaon-dashasar

जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर 


अमरावती/ तळेगाव दशासर  आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने तळेगाव दशासर येथील लिटिल लोटस इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात सांस्कृतिक कार्यक्रम साजरा केला. यावेळी विद्यार्थ्यांनी भगवान विठ्ठल व माता रुक्मिणी यांच्या आकर्षक वेशभूषा साकारत "विठ्ठल... विठ्ठल..." नामाचा अखंड गजर केला. टाळ-मृदुंगाच्या तालावर आणि भक्तिमय वातावरणात सादर झालेल्या कार्यक्रमामुळे संपूर्ण शाळा भक्तिरसात न्हाऊन निघाली.


विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशभूषेत साकारलेले दर्शन, अभंग आणि विठ्ठलनामाचा गजर यामुळे उपस्थितांची मने जिंकली. आषाढी एकादशीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे तसेच भारतीय संस्कृतीची ओळख त्यांना व्हावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका दीप्ती ढाकूलकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच शिक्षिका रुपाली बुधे, मयुरी मेश्राम आणि आंचल शिंदे यांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रमासाठी विशेष तयारी करून घेतली. कार्यक्रमाला शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विठ्ठल नामाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम उत्साहात व यशस्वीरित्या संपन्न झाला.

Post a Comment

Previous Post Next Post