डॉ.शिवलिंग नागापुरे यांचा पीएच.डी.पदवीबद्दल आमदार विक्रम काळे यांनी केला सन्मान

 


प्रतिनिधी/औसा 

जिल्हा परिषद कन्या प्रशाला भादा, ता. औसा येथील महाराष्ट्र शासन राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त डॉ.शिवलिंग उमाकांत नागापुरे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड च्या आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेंतर्गत शिक्षणशास्त्र विषयात पीएच.डी.(डॉक्टरेट)पदवी प्राप्त झाली आहे,त्याबद्दल मराठवाडा विभागाचे शिक्षक आमदार विक्रमबप्पा काळे साहेब यांनी डॉ.शिवलिंग नागापुरे यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले आहे. डॉ.शिवलिंग नागापुरे यांनी स्वामी विवेकानंद अध्यापक महाविद्यालय उदगीरचे प्राचार्य डॉ.गोपाळ पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेल्या "लातूर जिल्ह्यात इंस्पायर अवार्ड्स मानक योजनेमुळे विद्यार्थ्यांत विकसित होणारी संशोधनवृत्ती, सृजनशिलता व सामाजिक उपयोगितेचा अभ्यास" या संशोधन प्रबंधास मान्यता मिळून पीएच.डी.पदवी प्राप्त झाली आहे. डॉ.शिवलिंग नागापुरे यांनी भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत राबविल्या जाणाऱ्या इंस्पायर अवार्ड्स मानक योजनेशी संबंधित संशोधन कार्य पूर्ण केले आहे.ह्या योजनेशी यापूर्वी देशात पीएच.डी. स्तरावर फक्त एकच संशोधन झाले असून डॉ.नागापुरे यांचे या योजनेशी संबंधित देशातील दुसरे तर महाराष्ट्रातील पहिले संशोधन कार्य आहे.डॉ.शिवलिंग नागापुरे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल छत्रपती संभाजीनगर(मराठवाडा) विभागाचे शिक्षक आमदार तथा मुख्य प्रतोद (कॅबिनेट मंत्री दर्जा) विधानपरिषद विक्रमबप्पा काळे यांनी डॉ.नागापुरे यांच्या संशोधन विषयाची माहिती जाणून घेऊन त्यांचा सन्मान केला आणि अभिनंदन केले. तसेच डॉ.नागापुरे यांनी त्यांच्या प्रबंधात शासनासाठी सुचविलेल्या शिफारसी अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आमदार काळे साहेब यांनी सांगितले.यावेळी राजकुमार जाधव सर, प्रा. विवेकानंद ढगे, प्रा संभाजी नवघरे, प्रा. सिद्धलिंग गुजर, विकास सरकाळे, बाबासाहेब भिसे, किरणकुमार रायते, पद्माकर आतकरे आणि डॉ.नागापुरे यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post