विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे
किनवट येथील कलावती गार्डन येथे २४ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य सामूहिक विवाह सोहळ्यात तब्बल २३ जोडपी विवाहबंधनात अडकली. बौद्ध धम्म तसेच सत्यशोधक पद्धतीने पार पडलेल्या या विवाह सोहळ्याला सामाजिक ऐक्य व उत्साहाचे स्वरूप लाभले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किनवटच्या नगराध्यक्षा सुजाता येंड्रलवार या होत्या, तर उद्घाटक म्हणून युवा शिवसेना नेते यशदादा खराटे यांनी उपस्थिती लावली. प्रमुख पाहुणे म्हणून इसाखान साहेब, के. मूर्ती साहेब तसेच आदिवासी विकास परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष नंदिनी टारपे उपस्थित होत्या. मान्यवरांनी नवदाम्पत्यांना शुभाशीर्वाद देत आयोजकांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.
या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन समाजसेवक तथा किनवटचे माजी नगराध्यक्ष अरुण आळणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. देवकांत वंजारे सर व ॲड. आकांक्षा आळणे यांनी केले.
यावेळी नगरसेवक प्रशांत कोरडे, अभय महाजन, नगरसेविका ललिता मनस्वर, करुणा आळणे, प्राचार्य सुरेश पाटील, अजिंक्य आळणे, अतुल बनसोड, ॲड. सुभाष ताजणे, प्रा. खुपसे सर, सुभाष बाभुळकर, संधीवात तज्ञ डॉ. आमले, ॲड. मिलिंद सर्पे, पत्रकार फुलाजी गरड, किरण ठाकरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
