आंतरराष्ट्रीय डान्स स्पोर्ट्स चॅम्पियनशिपमध्ये श्रीजा पाटील प्रथम

 


  टीम इंडियासाठी अभिमानाचा क्षण 


     रायगड प्रतिनिधी : राकेश भोईर

आंतरराष्ट्रीय डान्स स्पोर्ट्स चॅम्पियनशिप 2026, नेपाळ येथे सुवर्णपदक पटकावून श्रीजा संदेश पाटील हिने भारताचे नाव उज्ज्वल केले आहे. तिच्या या शानदार यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



२४ मे २०२६ रोजी नेपाळ येथे पार पडलेल्या राष्ट्रीय Dance Championship 2026 मध्ये श्रीजाने उत्कृष्ट नृत्य सादरीकरण करत प्रथम क्रमांक पटकावला आणि गोल्ड मेडलवर आपले नाव कोरले. तिच्या दमदार परफॉर्मन्सने उपस्थितांची मने जिंकली.


तिचे समर्पण, कठोर परिश्रम आणि स्टेजवरील आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकला. सुवर्णपदक स्वीकारतानाचा क्षण उपस्थितांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला.


या उल्लेखनीय यशाबद्दल पाली-सुधागडचे तहसीलदार मा. श्री. कुंभार साहेब यांच्या हस्ते श्रीजाचे विशेष कौतुक व अभिनंदन करण्यात आले.


💃 OM SAI DANCE ACADEMY कडून श्रीजा पाटील हिचे विशेष अभिनंदन करण्यात आले असून, भविष्यातही अशीच यशाची शिखरे सर करण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.


Post a Comment

Previous Post Next Post