पाण्याचे शोधात आणखी एक हा रान डुकराचा तडफडून मृत्यू

 



श्री रेणुका माता मंदिराकडे जाणाऱ्या घाटातील रस्त्यावर पाण्याच्या वॉल जवळच रानडुकराचा तडफडून मृत्यू 


मेलेल्या रानडुकराचा प्रचंड घाण वास येत असल्याने भाविक त्रस्त वन विभाग बेफिकीर 


गावाकडची बातमी प्रतिनिधी माहुर किनवट पंकज जयस्वाल नांदेड मो- 9421367593


माहूर शहरासह तालुक्यातील जंगलात वन्यप्राण्यासाठी पिण्याचे पाणी नसल्याने अनेक जनावरे पाण्या अभावी तडफडून मृत्युमुखी पडत असून वन विभागाचे कमालीचे दुर्लक्ष यावर्षी चर्चेचा विषय बनले असून माहूर गडावर जाणाऱ्या घाटातील वळणदार रस्त्याजवळ असलेल्या पाण्याच्या पाईपलाईनच्या वाल जवळ रानडुक्कर पाण्याच्या आशेत 

बसला असता वॉल मधून पाणी आलेच नाही परिणामी रान डुक्कर पाण्यासाठी जागेवरच बसल्या बसल्या तडफडून मेल्याची घटना घडली असून या रानडुकराला मरून अनेक दिवस झाले तरीही वन विभागाचे कर्मचारी याकडे फिरकले नसल्याने मेलेल्या रानडुकराचा घाण वास सुटून भाविकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे 


याआधी गेल्या महिन्याभरात रस्त्याला लागून मेलेल्या अनेक रानडुकराची माहिती कळल्याने या विषयीच्या बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या तरीही जंगलात एक टँकर पाणीसुद्धा वन विभागाने टाकले नाही त्यामुळे जंगलाच्या आत किती जनावरे मेंली याचा पत्ता नाही वाईबाजार वानोळा परिसरात जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी प्रचंड घाण वास येतो त्यामुळे जंगलात असलेल्या हजारावर हजारो जनावरांपैकी किती जनावरे मेली त्याचा पत्ता नाही. शासनाकडून कोट्यावरून रुपयाचा निधी जंगलात पिण्याच्या पाण्यासाठी व्यवस्था करण्यासाठी येतात अनेक वर्षापासून आलेल्या निधीतून बनविलेले वन तळे खड्डे यात पाणी नाही पण मी टाकून वानतळे बनविणे ऐवजी पाणी शोषून घेणारे खड्डे बनवण्यात आले की काय वन तळे तयार करण्याऐवजी पाच वर्षात आलेला संपूर्ण निधी स्वाहा करण्यात आलेला आहे त्याची 100% खात्री वन प्रेमींना झाल्याने आज डुकरे जंगली जनावरे पाण्याच्या शोधात गावात रस्त्यावर येऊन तडफडून मरत असून पाण्यासाठी मरण मेलेल्या जनावरांच्या बीटचे अधिकारी कर्मचारी कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी भाविकासह नागरिकातून होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post