श्री देव देवेश्वर संस्थांचे महंत प..पू. मधुकर बाबा शास्त्री कवीश्वर यांचे प्रतिपादन
श्री आनंद दत्तधाम आश्रमात अधिक मासानिमित्त सुरू असलेल्या चुल बंद धोंडे जेवण अन्नदान कार्यक्रमास महंत बाबा मधुकर शास्त्री कवीश्वर यांची भेट
गावाकडची बातमी प्रतिनिधी माहुर किनवट पंकज जयस्वाल नांदेड मो 9421367593
माहूर गडावरील श्री आनंद दत्त धाम आश्रम येथे 17मे 2026 पासून सुरू झालेल्या धोंडे पुरुषोत्तम मास या निमित्ताने महा अन्नदान धोंडे जेवण कार्यक्रमास भगवान श्री दत्त प्रभूंचे नीद्रास्थान असलेल्या श्री देव देवेश्वर संस्थांनचे महंत मधुकर शास्त्री बाबा कवीश्वर यांनी भेट दिली असता यावेळी दत्तधाम आश्रमाचे मठाधिश महाराष्ट्र शासनाचे ब्रॅड ॲंबेसेडर स्वच्छता दुत राष्ट्रसंत द्.भ.प.साईनाथ महाराज यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांनी साईनाथ महाराजांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी मधुकर बाबा शास्त्री यांनी पुढे बोलताना सांगितले की श्री चक्रपाणी महाराजांनी नउशे वर्षांपूर्वी स्वच्छता अभियान 65 वर्ष राबविले होते त्यांचाच आदर्श घेऊन श्री संत गाडगेबाबा महाराज यांनी सुद्धा स्वच्छता अभियान राबवून देशाला नवी दिशा दिली होती त्यांचाच आदर्श घेऊन राष्ट्रसंत द.भ.प. साईनाथ महाराज वसमतकर यांनी सुरू केलेले स्वच्छता अभियान व्यसनमुक्ती अन्नदान महिला सक्षमीकरण वृक्षारोपण देशभक्ती शिक्षण जिवांचा उद्धार हे कार्य जगाला प्रेरणा देणारे आहेत आणि ज्या पद्धतीने साईनाथ महाराज हे कार्य करत आहेत त्यामुळे खरोखरच जीवांचा उद्धार होऊन जग यांच्या कार्याची नक्कीच प्रेरणा घेईल असे सांगून सर्व दत्त भक्तांच्या भक्तीने दत्तप्रभू प्रसन्न होऊन जगातील मानव जातीचे कल्याण करो अशी श्री दत्तप्रभू चरणी प्रार्थना केली.
यावेळी द.भ.प.साईनाथ महाराज म्हणाले की प.पू.मधुकर शास्त्री कविश्वर यांनी आश्रमाला भेट दिली हे आमचे भाग्य आहे.त्या या अधिकमास धोंडे जेवन कार्यक्रमासह आश्रमाच्या कार्याला आशिर्वाद दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानले.
यावेळी मठाचे प्रवक्ते भाऊ पाटील हडसणीकर . प्रतिष्ठित नागरिक जवाहरलाल जयस्वाल पत्रकार नंदकुमार जोशी विजय आमले , दिलीपराव पांडे, इलियास बावाणी, सुप्रसिद्ध रांगोळीकार सुरेश आराध्ये, बंडु भाउ कविश्वर,छगन भालेराव यांचेसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचलन आ.भा.शिक्षक परिषदेचे तालुका अध्यक्ष एस एस पाटील यांनी केले शेवटी दत्तप्रभुची आरती व राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची यशस्वी सांगता करण्यात आली.
