श्री रेणुका माता मंदिर दर्शन रांगेत भाविक महिलेचे रोख रकमेसह सोन्याचा ऐवज लंपास




श्री रेणुका माता मंदिर दर्शन रांगेत भाविक महिलेचे रोख रकमेसह सोन्याचा ऐवज लंपास


 रोख रकमेसह सोन्याचा ऐवज लंपास करणारी करणारी महिला सीसीटीव्हीत कैद ्


माहूर पोलिसांसमोर तपासाचे कडवे आव्हान.


गावाकडची बातमी प्रतिनिधी माहुर किनवट पंकज जयस्वाल नांदेड मो 9421367593


माहूर गडावरील श्री रेणुका माता मंदिरात दर्शन गृहात मुंबईची भाविक महिला दर्शन घेत असताना अज्ञात महिलांनी त्यांना धक्का मारून पुढे जाण्याचा बहाना करुन पर्समधील रोख रकमेसह दोन सोन्याया अंगठ्या एकूण 1 लाख 59 हजार 600 रु रुपयाचा ऐवज लंपास केल्याची घटना दि 18 हे 2026रोजी सकाळी 8 वाजता चे घडल्याने खळबळ उडाली आहे.सदर घटनेचा तपास करण्याचें कडवे आव्हान माहुर पोलीसांसमोर निर्माण झाले आहे.


माहूर गडावर गेल्या दोन दिवसापासून प्रचंड गर्दी असल्याने भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांवर प्रचंड ताण येत आहे श्री रेणुका माता मंदिरावर पोलीस सुरक्षा रक्षक सीसीटीव्ही कॅमेरे असताना नातेवाईकसह दर्शनासाठी आलेली महिला उषा सुधाकर तायडे वय 59 राहणार डोंबिवली मुंबई ह्या रांगेत उभे राहून दर्शन करण्याच्या मुख्य गर्भगृहात पोहोचल्या दर्शन घेत असताना मागून दोन महिलांनी दर्शनासाठी धक्काबुक्की करत पुढे गेल्या त्याच गडबडीत महिलेच्या गळ्यात अडकविलेल्या पर्समधील रोख रक्कम 59 हजार 600 रुपये तसेच दोन सोन्याच्या अंगठ्या असा एकूण एक लाख 59 हजार 600 रुपयांचा ऐवज लंपास केला सदर महिलेने देवस्थान वरील सीसीटीव्हीचे फुटेज घेऊन माहूर पोलीस स्टेशन गाठुन फिर्याद दिली पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी तात्काळ घटनेची दखल घेत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post