नगर पंचायतीच्या हलगर्जी पणामुळे आय लव्ह माहुरची झाली दुरावस्था.

 




स्थानिकांसह  भाविकांमध्ये नाराजीचा सूर.


गावाकडची बातमी प्रतिनिधी माहुर किनवट पंकज जयस्वाल नांदेड मो 9421367593


 साडेतीन शक्तिपीठांपैकी मुळपीठ असलेल्या देवभूमी माहुर गडावरील दत्तशिखर.श्रीरेणुका देवी मंदीरात कडे जाणाऱ्या मार्गावर नगर पंचायती तर्फे  बनविलेल्या आय लव्ह माहुर स्थळाची देखभाली ऐवजी अतिशय दुरावस्था झाली असून  स्थानिकांसह  भाविकामधुन नाराजी व्यक्त केली जात आहे.

 

माहूर गडावर दरदिवशी हजारो भाविक दर्शनासाठी येतात  नगर पंचायती तर्फे  वर्षभरात पार पडणाऱ्या यात्रा काळात वाहनतळ करापोटी लाखो रुपये वसुली केली जाते परंतु भाविकांसाठी  सुलभ शौचालय, स्नानगृह पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात आली नसल्याने भाविकांना गैरसोयीचा सामना करावा लागत असुन नगरपंचायत प्रशासन मात्र विकासाची ढाल करून सर्व नियम धाब्यावर बसवून शहराबाहेर सिमेंट रस्त्याचे दर्जाहीन कामे करुन करोडोंच्या नीधीचा बट्याबोळ करण्यातच धन्यता मानत असुन भाविकांसाठी कुठल्याही सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नसल्याने नगर पंचायतीचा कारभार म्हणजे "वरुन किर्तन आतुन तमाशा"असाच झाला आहे.


गडावर जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर निळकंठेश्वर महादेव मंदीराच्या समोरील रस्त्याच्या कडेला असलेल्या निसर्ग रम्य ठिकाणी नगर पंचायती तर्फे आयलव्ह माहुर स्थळाची निर्मिती करण्यात आली होती या ठिकाणी  नामफलक,लाईट, आसन व्यवस्था करण्यात आली होती.गडावर दर्शनासाठी असलेले भाविक याठिकाणी फोटोसेशन,सोबत आणलेले जेवणाचे डबे व खाद्यपदार्थांचे सेवन करुन निसर्गाचा मनमुराद आनंद घेत होते परंतु नगर पंचायतीच्या हलगर्जीपणामुळे देखभाली ऐवजी अल्पावधीतच उध्वस्त झाल्याने भाविकांना दुखी अंतःकरणाने परत जावे लागत आहे हि बाब निश्चितच नगरपंचायती साठी लाजीरवाणी असुन यावर  मोठ्याप्रमाणात करण्यात आलेला खर्च पाण्यात गेला आहे.


नगरपंचायत प्रशासनातर्फे या स्थळाची तातडीने दुरुस्ती करून त्याठिकाणी कायमस्वरूपी कर्मचारी,पीण्याचे ,पाणी साफसफाईसह आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या अशी मागणी स्थानिक नगरीकांसह भाविकांकडुन केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post