महिला सक्षमी करणात महाराजांचे कार्य कौतुकास्पद तृप्ती देसाई यांचे प्रतिपादन
आनंद दत्तधाम आश्रम येथे अधिक मास निमित्त सुरू झालेल्या चूलबंद धोंडे जेवण महापंगत महाअन्नदानास तृप्ती देसाई यांची उपस्थिती
राज्यभरातून आलेल्या भाविक भक्त नागरिकांसाठी आनंद दत्त धाम आश्रम येथे अधिक मास निमित्त महिनाभर महापंगत महा अन्नदानची सुरुवात
गावाकडची बातमी प्रतिनिधी माहुर किनवट पंकज जयस्वाल नांदेड मो 9421367593
माहूर गडावरील श्री आनंद दत्तधाम आश्रम येथे अधिक मास धोंड्याच्या महिन्या निमित्त आश्रमाचे मठाधिश राष्ट्रसंत द भ प साईनाथ महाराज वसमतकर यांचे पुढाकारातून दरवर्षी अन्नदान होतो यावर्षी धोंडे जेवण महाअन्नदान महापंगत चूल बंद कार्यक्रमाचे दी 17 मे ते 15 जून पर्यंत आयोजन करण्यात आल्याने या महाअन्नदान कार्यक्रमात महिनाभर येणारे भाविक तालुक्यातील राज्यातील नागरिक लाभ घेणार आहेत या कार्यक्रमास तृप्ती देसाई यांनी उपस्थिती लावत चूल बंद महाअन्नदान महापंगतीची शुभ हस्ते सुरुवात केली यावेळी त्यांनी साईनाथ महाराजांच्या सप्तसुत्री कार्यक्रमांतर्गत महिला सक्षमीकरणाच्या राज्यभर व्यापलेल्या कार्याचे कौतुक करून साईनाथ महाराजांचे अभिनंदन केले
आनंद दत्त धाम आश्रम तथा उपस्थित मान्यवरांच्या वतीने तृप्ती देसाई यांचा हृदय सत्कार करण्यात आला भूमाता फाउंडेशन ब्रिगेडच्या संस्थापिका अध्यक्षा तृप्ती देसाई पुणे यांनी साईनाथ महाराजांचे कार्य कौतुकास्पद असून लुटारू भोंदू बाबांच्या युगात साईनाथ महाराजांसारखे युगपुरुष निर्माण होणे कठीण असून त्यांचे कार्य उत्तरोत्तर प्रगती करो अशी भगवंता चरणी प्रार्थना ही केली
यावेळी मंत्रालयिन सनदी अधिकारी प्रशांत राठोड शिवसेना ऊ.बा.ठा. नांदेड जिल्हाप्रमुख ज्योतिबा दादा खराटे नगराध्यक्ष फिरोज भाई दोसानी कैलास गोरठेकर, नानाभाऊ गोरठेकर नंदकुमार संतान जवाहरलाल जयस्वाल विजय आमले नंदकुमार जोशी अनिल वाघमारे दीपक कान्नव भाऊराव पाटील हडसनीकर रमेश बद्दीवार अनिल कोरटकर प्रल्हाद देवडे वसंतराव कपाटे आशिर्वाद पाटील इलियास बावाणी दिगंबर जोशी संजय घोगरे पुंडलिक हुंबे सीताराम पाटील जयकुमार अडकिने गोपाल खापर्डे विनोद भारती अभिषेक जयस्वाल माधव वटपलवार पी जी रुद्रवाड यांचे सह मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थिती लावत मनोगते व्यक्त केली.
आनंद दत्तधाम आश्रम येथे कार्यक्रमाच्या उद्घाटन सुरुवात प्रसंगी आलेल्या भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका तृप्ती ताई देसाई यांना भेटून बोलण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या कार्यक्रमाचे बहारदार संचलन व आभार शेषराव पाटील यांनी केले. चुलबंद धोंडे जेवणाच्या कार्यक्रमास भाविक भक्तासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.


