🩸 बकरी ईद निमित्त अमरावतीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन 🩸

 




🩸 बकरी ईद निमित्त अमरावतीत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन 🩸


गाव सहेली नेटवर्क अमरावती :- 

“मुक्या प्राण्यांची कुर्बानी न देता… मानवतेसाठी रक्तदान करूया!” असा सामाजिक संदेश देत

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अमरावती व बडनेरा शाखेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे रक्तदान शिबिर बुधवार, दि. 27 मे 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तपेढी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, अमरावती येथे आयोजित करण्यात आले आहे.

या उपक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. सतीश तराळ, प्रमोद कोळमकर, मो. अफसर भाई, रेहमान शहा, वि. दा. पवार, हर्षा सगणे तसेच राजीव बसवनाथे उपस्थित राहणार आहेत.

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर धर्म, मानवता आणि सामाजिक एकतेचा संदेश देत गरजू रुग्णांना जीवनदान मिळावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” असल्याचे सांगत आयोजकांनी नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

“आपले एक रक्तदान कुणाच्यातरी आयुष्याला नवी आशा देऊ शकते,” असा भावनिक संदेश देत सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी युवकांनी पुढे यावे, असेही आयोजकांनी म्हटले आहे.



या शिबिरासाठी प्रफुल्ल मंदा श्रीधर, विजय डवरे, सुभाष गौरखेडे, नरेंद्र धर्माळे, दिलीप लाडे, सचिन खोब्रागडे, आशिष देशमुख, गणेश गहुकर, विजया करोले, विजया घोडेस्वार, मंजू वासानिक, मनाली इंगळे, मोनाली सदावर्ते, जय करोले, महादेव मेश्राम यांच्यासह महा. अनिस अमरावतीचे सर्व सदस्य व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

या उपक्रमास गुरुदेव सेवाश्रम ट्रस्ट, क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटन आणि संविधान जागर अभियान यांचे सहकार्य लाभले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post