पारदर्शकतेच्या लढ्याला नवे बळ; अभिषेक गावंडे पुन्हा जिल्हाध्यक्ष

 




उपसंपादक संतोष भालेराव 


दर्यापूर तालुक्यातील कळाशी येथील युवा RTI कार्यकर्ते अभिषेक पंजाबराव गावंडे यांची "माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ" या राज्यस्तरीय संघटनेच्या अमरावती जिल्हाध्यक्षपदी पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती दिनांक १६ मे २०२६ पासून पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार आहे.

अभिषेक गावंडे हे माहिती अधिकार क्षेत्रात धडाडीने काम करणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. विविध शासकीय कामांतील अनियमितता, भ्रष्टाचार व पारदर्शकतेच्या मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने माहिती अधिकाराच्या माध्यमातून आवाज उठवला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक प्रकरणांमध्ये प्रशासनाला कार्यवाही करावी लागली आहे.

त्यांच्या या पुनर्नियुक्तीमुळे अमरावती जिल्ह्यात RTI चळवळीला अधिक बळ मिळणार असून, सामान्य नागरिकांमध्ये माहिती अधिकाराबाबत जागरूकता वाढवण्यासाठी ते अधिक प्रभावीपणे काम करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर यांनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

गावंडे यांनी सांगितले की, “माहिती अधिकार हा सामान्य नागरिकांचा सर्वात मोठा हक्क आहे. या माध्यमातून अन्याय, भ्रष्टाचार व अपारदर्शकतेविरोधात माझा लढा अधिक तीव्र करणार आहे.”

त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post