मृत्यूनंतरही जीवदान| कंचली येथील शिल्पा राठोड यांचे अवयव दान समाजासाठी प्रेरणादायी

 




दोन किडनी. लिव्हर आणि ह्रदय दान करून चार रुग्णांना मिळाले नवजीवन 


गावाकडची बातमी प्रतिनिधी माहुर किनवट पंकज जयस्वाल नांदेड मो-9421367593


किनवट तालुक्यातील अती दुर्गम भाग असलेल्या मौजे कंचली तांडा येथील शिल्पा शामराव राठोड वय 34 यांनी मृत्यूनंतरही मानवतेचा महान आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या अवयवादानाच्या निर्णयामुळे चार गरजू रुग्णांना नवजीवन मिळाले असून संपूर्ण परिसरातून त्याच्याबद्दल आदर व्यक्त केला जात आहे.

शिल्पा राठोड या मागील काही वर्षापासून पुणे येथील डी. वाय. पाटील कॉलेज रुग्णालयात प्रशासकीय पदावर कार्यरत होत्या. आपल्या कर्तव्यदक्षतेमुळे व नम्र स्वभावामुळे त्या सर्वांच्या परिचयाच्या होत्या. दिनांक 10 मे रोजी त्यांना अचानक उच्च रक्तदाबांचा त्रास होऊन मेंदूमध्ये रक्तस्त्राव ब्रेन हेमरेज झाला. त्यानंतर त्याच्यावर पुण्यातील डी. वाय. पाटील हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना ब्रॅण्डेड घोषित केले. या अत्यंत दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांनी मोठा धीर दाखवत अवयवदानाचा निर्णय घेतला. त्यांचे पती शामराव राठोड. मुलगा विनायक राठोड. किरण सूर्यवंशी. आई शीला जाधव व वडील शकील जाधव यांनी सहमती दर्शवली. या निर्णयामुळे शिल्पा राठोड यांच्या दोन किडनी. लिव्हर आणि ह्रदय गरजू रुग्णांना दान करण्यात आले. त्यांच्या या अवयव दानामुळे चार रुग्णांना नवजीवन मिळाले असून. त्यांच्या मृत्यूनंतरही त्या इतरांच्या आयुष्यात जिवंत राहिले आहेत. 

डी. वाय. पाटील कॉलेज रुग्णालयात त्यांच्या पार्थिवावर मानवंदना देण्यात आली. यावेळी डॉक्टर. कर्मचारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

या दुःख प्रसंगात घेतलेला कुटुंबीयांचा निर्णय अत्यंत प्रेरणादायी असून किनवट तालुक्यासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शिल्पा राठोड यांचा अंत्यविधी त्यांच्या मूळ गावी कंचली तांडा येथे दिनांक 18 मे रोजी सकाळी नऊ वाजता होणार असल्या ची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post