आनंद दत्तधाम आश्रम बनला लाखो भाविकांचे श्रद्धास्थान.

 



अधिक मासानिमित्त दोनच दिवसात हजारो भाविकांनी घेतला अन्नदानाचा लाभ 


गावाकडची बातमी प्रतिनिधी माहुर किनवट पंकज जयस्वाल नांदेड मो 9421367593


माहूर गडावरील सह्याद्रीच्या कुशीत अंदाजे तिस वर्षांपूर्वी सेवानिवृत्तीनंतर द.भ.प.दत्ता महाराज वसमत कर यांनी निर्माण केलेल्या झोपडी रुपी आनंद दत्तधाम आश्रमाचे वटवृक्षात रूपांतर झाले असून आनंद दत्तधाम आश्रम लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे राष्ट्रसंत दभप साईनाथ महाराज वसमतकर यांचे कार्य महाराष्ट्र बाहेर देशाच्या अनेक राज्यात पोहोचल्याने साईनाथ महाराजांचा भक्त परिवार मोठ्या प्रमाणात वाढत असून समाजसेवा स्वच्छता अभियान अन्नदानामुळे श्री आनंद दत्तधाम आश्रमाचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहे


दत्त धाम आश्रमाच्या माध्यमातून मठाधिश महाराष्ट्र शासनाचे ब्रॅड ॲंबेसेडर स्वच्छता दुत राष्ट्रसंत द.भ.प.साईनाथ महाराज यांच्या पुढाकाराने सप्त सुत्री उपक्रमांतर्गत व्यसन मुक्ती, स्वच्छता अभियान, शैक्षणिक परीषद, महिला सक्षमीकरण, ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्ण व नातेवाइकांना दोन्ही वेळ भोजनाचे डबे,भजन कीर्तन,नित्य अन्नदान,यासह अध्यात्मिक धार्मिक उपक्रम राबविले जात आहेत. ऐवढ्यावरच न थांबता , आश्रमाच्या वतीने अतिवृष्टी, कोरोना सारख्या नैसर्गिक संकटात सापडलेल्या संकटग्रस्तांना धान्याचे किट,संसार उपयोगी वस्तुंचे वाटप, तालुक्यातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते. विशेष बाब जिसका कोई नही उसका खुदा है यारो या म्हणीप्रमाणे  मागील दहा वर्षांपूर्वी शहरातील आदिवासी वस्तीत वास्तव्यास असलेल्या 80वर्षाची आजीबाई व मनोरुग्ण नात या दोघींना कुणीच नसल्याने त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता,त्यांचेवर उपासमारीची वेळ आली होती हि बाब कानी पडताच साईनाथ महाराजांनी तात्काळ त्यांची भेट घेऊन त्यांची अन्न, वस्त्राची जबाबदारी स्वीकारून त्या दोघींना शेवटच्या श्वासापर्यंत दोन्ही वेळ भोजनाचे डबे आजही पुरविले जात आहेत.या घटनेमुळे जिसका कोई नही उसका साईनाथ है यारो याची माहुर करांना प्रचिती आली आहे.

 तसेच वर्षभरात संपन्न होणाऱ्या दत्तजयंती, रक्षाबंधन,शारदीय नवरात्र, गुरुपौर्णिमा यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते विशेषतः दर तिन वर्षांनी येणाऱ्या पुरूषोत्तम अधिक मासानिमित्त संपूर्ण महीनाभर शहर, तालुक्याला दोन्ही वेळ भोजनाचे चुल बंद निमंत्रण तसेच देशभरातुन दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी अन्नदान महाप्रसादाचे आयोजन केले जाते. 

 या आश्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी धागेदोरे, गंडे, भोंदु गिरी, बुवाबाजी, अंधश्रद्धेला मुळीच थारा नसुन केवळ पारदर्शकपणे जन उपयोगी स्तुत्य उपक्रम राबविले जात असुन या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी पावत ना देनगी असा कुठलाही आर्थिक व्यवहार केला जात नसल्याने. आनंद दत्तधाम आश्रम लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे.

 आनंद दत्तधाम आश्रमाचे कार्य केवळ माहुर पुरते मर्यादित नसून साईनाथ महाराज यांनी हजारों लोकांना सोबत घेऊन देशाच्या सिमेवर दत्तनाम सप्ताहाचे आयोजन करुन स्वर्ण मंदीरात स्वच्छता अभियान राबविले ही बाब  दत्भक्तांसाठी निश्चितच भूषणावह आहे.


द.भ.प. साईनाथ महाराजांचे गौरवशाली कार्याची दखल घेऊन  त्यांना महाराष्ट्र शासनाचे ब्रॅंड ॲंबेसेडर स्वच्छता दुत, औद्योगिक प्रशिक्षण संस्था मार्गदर्शक म्हणून पदवी बहाल करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.ही बाब काही स्वार्थी, विकृत मंडळींच्या पचणी पडली नसल्याने वैफल्यग्रस्त होऊन अतिशय पारदर्शकपणे  राजकारण विरहीत समाज कार्य करीत असलेल्या दत्तधाम आश्रमाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post