डोंगरकिन्ही ग्रामपंचायत वादात – ध्वज न उतरवल्याने कार्यवाहीची मागणी

 



डोंगरकिन्ही ग्रामपंचायतमध्ये ध्वज उतरवण्यास दुर्लक्ष – कार्यवाहीची मागणी


डोंगरकिन्ही , मालेगाव :डोंगरकिन्ही येथील ग्रामपंचायत कार्यालयावर १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त तिरंगा ध्वज मोठ्या उत्साहात फडकवण्यात आला. यावेळी ग्रामविकास अधिकारी संतोष राठोड तसेच माजी सरपंच वसंता आडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

मात्र, नियमानुसार सूर्यास्तापूर्वी तिरंगा ध्वज उतरवणे बंधनकारक असताना, रात्री सुमारे ८:३० वाजेपर्यंतही ध्वज खाली उतरवण्यात आला नव्हता. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.




जर बेवारस राहिलेल्या या तिरंगा ध्वजाचा अवमान किंवा विटंबना झाली, तर याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.

याप्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल संबंधित ग्रामविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विनोद अंभोरे आणि सतीश गवई यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post