91 पैकी 23 विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये; कृपा देवळे तालुक्यात प्रथम
जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर मो- 88065 81053
धामणगाव रेल्वे / अंजनसिंगी : मदर टेरेसा न्यू इंग्लिश सायन्स कॉलेज, अंजनसिंगी येथील विद्यार्थ्यांनी यंदाही उत्कृष्ट यश संपादन करत सलग नवव्या वर्षी 100 टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. एकूण 91 विद्यार्थ्यांपैकी 23 विद्यार्थ्यांनी डिस्टिंक्शनमध्ये यश मिळवले, तर 55 विद्यार्थी फर्स्ट क्लास आणि 13 विद्यार्थी सेकंड क्लासमध्ये उत्तीर्ण झाले.
जनरल सायन्स शाखेतून कु. कृपा देवेंद्र देवळे हिने 90.33% गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला. तिच्यासह अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे.
प्रमुख यशस्वी विद्यार्थी:
यशश्री प्रवीण उघडे – 84.50%
यशस्वी अंगद राऊत – 83.33%
समृद्धी दिनेश गोरे – 83.17%
निशिगंधा गजानन वानखडे – 81.83%
दिव्या प्रवीणराव साबळे – 81.67%
श्रावणी ज्ञानेश्वर वानखडे – 81%
श्रेया राजेंद्र कडू – 80.83%
अपूर्वा अजय गोरले – 79.67%
प्रथमेश सोहन मुंडेकर – 78%
सोहम विकास गबने – 77.33%
अथर्व दिनेश ठाकरे – 77.17%
सायली राजेश झाडे – 76.83%
कुणाल शैलेश निस्ताने – 76%
श्रावणी दिनेश वैरागडे – 75%
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रमोद कुर्जेकार, सचिव विनोद कुर्जेकार, प्राचार्य प्रवीण शिरसाट तसेच प्राध्यापक सौरव धोटे, हटवार सर, घारपवार मॅडम आणि इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.


