मुख्यालयी न राहता लाटत आहे घर भाडे भत्ता




दुबळवेळ जि.प. शाळेत HRA घोटाळा : मुख्याध्यापकासह 4 शिक्षक मुख्यालयी न राहता लाटत होते घरभाडे भत्ता, RTI कार्यकर्त्याची CEO कडे तक्रार


मालेगाव, दि. 07 मे 2026 : मालेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दुबळवेळ येथील मुख्याध्यापक व 3 सहा. शिक्षकांनी गावात वास्तव्यास नसतानाही खोटे कागदपत्र बनवून बेकायदेशीर घरभाडे भत्ता लाटल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.


कोण आहेत आरोपी ?

1. श्री नारायण भगवान शेळके - मुख्याध्यापक  

2. श्री मंचकराव भुजंगराव तायडे - सहा. शिक्षक  

3. श्री महादेव नारायण शेंगळे - सहा. शिक्षक  

4. श्री एकनाथ ज्ञानबा सोळंके - सहा. शिक्षक  


*कसा झाला उघडकीस?*  

RTI कार्यकर्ते कैलास बनसोड यांना माहिती मिळाली की, वरील चौघेही दुबळवेळ गावात राहत नाहीत. मात्र ग्राम दुबळवेल येथे खोटे भाडेकरार बनवून HRA घेत आहेत. वित्त विभागाच्या शासन निर्णय दि. 01/03/2016 नुसार "मुख्यालयी न राहणाऱ्यास HRA मिळणार नाही" असा स्पष्ट नियम आहे.


पुरावा कुठे सापडला..?

ग्रामपंचायत दुबळवेळच्या नमुना नं. 8 मध्ये या शिक्षकांची भाडेकरू म्हणून नोंद नाही. तसेच 15/05/2018 च्या शासन परिपत्रकानुसार "ग्रामसभा इतिवृत्त हाच मुख्यालयी वास्तव्याचा पुरावा" असतो. दुबळवेळच्या ग्रामसभा रजिस्टरमध्ये या शिक्षकांच्या मुख्यालयी हजेरीची नोंद कुठेही आढळून येत नाही.


CEO कडे काय मागणी..?  

RTI कैलास बनसोड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. वाशिम यांच्याकडे लेखी तक्रार देऊन चारही शिक्षकांकडून उचललेला HRA वसूल करावा व भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 व भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये फौजदारी गुन्हा नोंद करावा, अशी मागणी केली आहे.

7 दिवसांचा अल्टिमेटम

"7 दिवसात कारवाईचा अहवाल न दिल्यास CEO सुद्धा या फौजदारी कटात सामील असल्याचे समजून त्यांच्यावरही कारवाई करणार", असा इशारा बनसोड यांनी दिला आहे. या तक्रारीची प्रत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती यांनाही पाठवण्यात आली आहे.


पुढे काय..?

दुबळवेळ प्रकरण उघडकीस आल्याने तालुक्यातील इतर शाळांमध्येही खळबळ उडाली आहे. CEO कार्यालयाने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.


Post a Comment

Previous Post Next Post