दरोड्याच्या तयारीत असताना पोलिसांची धाड; 34 लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त
दरोडा घालण्याचा तयारीत असल्याचे निष्पन्न
धामणगाव / मंगरूळ दस्तगीर
मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असतांना, 6मे बुधवार रोजी 11 ते 12 वाजताच्या दरम्यान मंगरुळ दस्तगीर रोडवरील हंसराज जाधव यांचे शेताजवळ, ग्राम आष्टा शेतशिवारात, काही इसम रोडलगत आपलेकडील 03 चारचाकी वाहन व 1 दुचाकी वाहन लावुन, संशयास्पद परीस्थीतीत दबा धरुन बसलेले दिसुन आले, त्यावेळी पोलिसांनी मोठ्या सीतापीने पोलिस स्टॉपसह आरोपींना पकडले यामध्ये इसम नामे 1. रवी रुपराव मेश्राम वय 28 वर्ष, रा. हरीरामनगर पुलगांव ता देवळी जि वर्धा 2. अमित गणेशराव चौधरी वय 28 वर्षे रा बडे प्लॉट कॉलनी पुलगांव ता देवळी जि वर्धा 3. मंगेश श्रावण मेश्राम वय 39 वर्ष, रा. आष्टा ता धामणगांव रेल्वे जि अमरावती हे मिळुन आले व त्यांचे साथीदार 1. राज नहारकर रा पुलगांव 2. मंगेश सुखलाल ठाकरे रा मंगरुळ दस्तगीर, 3. आदेश नाकाडे रा मंगरुळ दस्तगीर 4. चेतन मोहोळे रा झाडा आणि आणखी एक इसम अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले. पकडलेले इसमांवर व त्यांचे ताब्यातील वाहनांची झडती घेतली असता त्यांच्या जवळून 2 तलवारी, 1 फरश्या, 4 चाकु, 2 स्टीलचे रॉड, 3 लाकडी बाशाचे काठ्या व मीरची पुड तसेच एक महिंद्रा थार, सुजुकी ब्रेजा कार, ओल्ड्स वॅगन पोलो कार आणि होंडा शाईन मोटरसायकल असे एकुण रु 3468300/- चा माल मिळुन आला आहे. त्यांचे कडे विचारपुस केली असता ते सर्व मिळुन दरोडा घालण्याचे उद्देशााने व पुर्ण तयारीनिशी तेथे थांबलेले असल्याचे निदर्शनांस आल्याने त्यांना ताब्यात घेवुन पोलिस अंमलदार सहदेव राठोड बनं 599 यांचे तक्रारीवरुन, अप.क्र. 157/2026 कलम 310(4), भारतीय न्याय संहिता 2023 सहकलम 4/25 भारतीय हत्यार कायदा अन्वये, गुन्हा नोंद केला असुन, दाखल गुन्ह्याचा पुढील तपास करीत असून तपासादरम्यान पळुन गेलेले आरोपीपैंकी शोध घेतला असता, आदेश मिलन नाकाडे वय 24 वर्षे रा मंगरुळ दस्तगीर ता धामणगांव रेल्वे जि अमरावती हा घटनास्थळापासुन काही अंतरावर मिळुन आला आहे.
सदरची कारवाई निकेतन कदम पो. अधीक्षक अमरावती ग्रामीण, दत्ता तोटेवार अप्पर पोलिस अधिकारीअमरावती ग्रामीण, अनिल पवार उपविभागीय पोलिस अधिकारी अमरावती ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली पो. स्टेशन मंगरूळ दस्तगीर येथील सपोनी शरद आहेर, पोलिस अंमलदार सहदेव राठोड, अमरदीप वाघमारे, सतीश ठवकर, पो. कॉ. जीवन लांडगे, जय गवई, अमोल हिवराळे, अविनाश राठोड, स्वप्निल चिंचखेडे, संदीप पाटील, प्रभू राठोड यांच्या पथकाने केली आहे.
तसेच नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, आपले परीसरात संशयास्पद हालचालींची माहिती तात्काळ पोलीसांना द्यावी.

