गगनबावडा तालुक्यातील नंदकुमार पोवार यांचे कोल्हापूर जिल्हा परिषदेवरती स्वीकृत सदस्य पदासाठी नाव चर्चेत.
गगनबावडा, प्रतिनिधी
गगनबावडा म्हणजे कुल्लू मनाली सारखे थंड हवेचे ठिकाण. पश्चिम महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणाऱ्या महाबळेश्वरला पर्याय म्हणून गगनबावडा ओळखला जातो. तालुका ठिकाण पंत अमात्य बावडेकर सरकार यांची जहागिरी,परमपूज्य योगी गगनगिरी महाराज किल्ले गगनगड सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीत लपलेल्या त्या पर्वत रांगा, तालुक्यातील विविध ठिकाणी वाड्या वस्तीमध्ये दडलेली ती 29 गावे तळकोकणचा घाट ते कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाला जोडला गेलेला दुवा मधला म्हणून 'गगनबावडा' ओळखला जातो.
सत्तरी पार केलेल उमद नेतृत्व,
पांढरी शुभ्र कपडे,कपाळावरती उभा गंध, चेहऱ्यावरती नेहमी स्मित हास्य,भाषण करताना त्यातून वाहली जाणारी
'शब्दांची फुले' असं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व म्हणून नंदकुमार पोवार यांच्याकडे बघितले जाते.
गगनबावडयाचे भूमिपुत्र म्हणून सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष, व्याख्याते विचारवंत अध्यात्मिक धार्मिक प्रवचनकार गगनबावडा ग्रामपंचायतचे माजी सरपंच नंदकुमार पोवार यांना जिल्हा परिषद कोल्हापूर वरती भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वीकृत सदस्य पदी घ्यावे या मागणीला आता जोर धरू लागला आहे.
गगनबावडा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या पक्षाच्या विविध पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जिल्हास्तरीय विविध पदाधिकारी, पक्षाचे महामंत्री, नेते यांच्या भेटीगाठी घेतल्या असून नंदकुमार पोवार यांना स्वीकृत सदस्य पदी घेण्याबाबतचे आश्वासन पक्षातील विविध पदाधिकारी गगनबावडा यांना दिल्याचे समजते.
गगनबावडा ग्रामपंचायत चे माजी सरपंच नंदकुमार पोवार यांची सामाजिक राजकीय व आध्यात्मिक कारकिर्दीची सुरुवात गगनबावडा तालुक्यातून झालेली आहे.
परमपूज्य योगीराज गगनगिरी महाराज यांचे शिष्य म्हणून त्यांनी आध्यात्मिक क्षेत्रात चांगली कामगिरी केलेली आहे.गगनबावडा येथील लोकप्रिय उत्सव श्री राम नवमी नंदकुमार पोवार यांच्या पुढाकारातून दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
श्री पोवार हे उत्कृष्ट वक्ते म्हणून प्रसिद्ध असून विविध ठिकाणी त्यांना जयंती उत्सव व धार्मिक कार्याच्या निमित्ताने व्याख्याते म्हणून बोलवले जाते.
कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रिय माजी खासदार दिवंगत बाळासाहेब माने यांच्याकडे त्यांनी काही वर्षे स्वीय सहाय्यक म्हणून सेवा केली होती.
स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये स्वीकृत सदस्य म्हणून जाऊन सभागृहामध्ये ग्रामीण भागातील नागरी समस्यांना वाचा फोडण्यासाठी गगनबावडा तालुक्यातील दुर्लक्षित समस्येला स्थानिक प्रश्नांना तसेच रखडलेल्या विविध विकास कामांना न्याय मिळवून देण्यासाठी एक अभ्यासू वक्ता म्हणून श्री पोवार यांना स्वीकृत सदस्य म्हणून घ्यावे अशी मागणी गगनबावडा तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबाकडून होत आहे.

