तळेगाव दशासर येथे भव्य रोजगार मेळावा संपन्न

 



शंभरच्या वर विद्यार्थ्यांनी नोकरीसाठी नामांकन दाखल केले



जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर 


तळेगाव दशासर/ अमरावती :- स्थानिक येथील दत्त मंदिरात दिनांक 26 मे मंगळवार रोजी भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सदर मेळाव्याला अहिल्यानगर येथील नामांकित कंपन्यांचा सहभाग नोंदवला गेला. तसेच सदर मेळाव्याला श्रीकांत गाडे HR हेड स्नायडर इलेक्ट्रिक , वीरेंद्र दहिफळे, HR डेप्युटी मॅनेजर, स्नायडर इलेक्ट्रिक, सचिन ठोसर संचालक ठोसर लेबर कॉन्ट्रॅक्टर, लक्ष्मण पवार HR एकझिक्यूटीव ग्लोबल मॅनेजमेंट कन्सल्टंट, आदिनाथ वाघ HR, KSB पंप लिमिटेड, नवनाथ दहातवाड, यशस्वी अकॅडमी स्कील वरील सर्व अहिल्यानगर एम आय डी सी इंडस्ट्रीयल एरिया येथील असून इत्यादींनी या मेळाव्याला मार्गदर्शन केले. हा मेळावा भारतीय जनता पार्टी तळेगाव दशासर यांच्या वतीने घेण्यात आला. यावेळी अनेक तरुण व तरुणींनी आपले नामांकन अर्ज दाखल केले. या भव्य रोजगार मेळाव्याला योगेश आखरे भाजपा जिल्हा सचिव ओबीसी, नरेंद्र रामावत माजी पंचायत समिती सदस्य, शाम घाटे माजी उपसरपंच, गजानन शेंद्रे, नंदू गवळी, दिलीप पेंदाम, बाळासाहेब शिरपूरकर इत्यादी मान्यवर उपस्थितीत होते.

Post a Comment

Previous Post Next Post