साईनाथ महाराजांमुळे लोकसेवेची प्रेरणा मिळते -आमदार राहुल पाटील यांचे प्रतिपादन

 




परभणीचे आमदार राहुल पाटील यांची श्री आनंद दत्त धाम आश्रम माहूर येथे भेट 





विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे सह पंकज जयस्वाल 

श्रीक्षेत्र माहूर : माहूर गडावरील श्री आनंद दत्त धाम आश्रम येथे धोंड्याच्या महिन्यानिमित्त मोठ्या प्रमाणात महाप्रसाद महापंगतीचे आयोजन करण्यात आल्याने परभणीचे आमदार  राहुल पाटील यांनी येथे भेट देऊन आदरणीय राष्ट्रसंत ह भ प साईनाथ महाराज वसमतकर यांचे दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की मी वेळोवेळी श्री साईनाथ महाराजांची भेट घेऊन दर्शन घेत असतो त्यांच्या संगतीत राहिल्याने मला लोकसेवेचे प्रेरणा मिळते असे त्यांनी यावेळी सांगितले


माहूर गडावरील श्री आनंदाचा धाम आश्रम येथे दरवर्षी धोंड्याच्या महिन्यात महानदान महाप्रसादाचे वितरण होत असते येथे महिन्याभरात लाखोच्या संख्येने भाविक भेट देऊन अन्नदानाचा लाभ घेत असतात यामध्ये सर्व प्रकारचे लोकसेवक या ठिकाणी येऊन साईनाथ महाराजांच्या सप्तसुत्री कार्यक्रमाचा अनुभव घेत असतात ही बाब शासनाच्या कानी गेल्याने शासनाकडून आय.टी.आय.चे प्रमुख मार्गदर्शक ब्रँड अँबेसिडर म्हणून साईनाथ महाराजांची नेमणूक करण्यात आली असल्याने तसेच त्यांचे सप्त सुत्री कार्यक्रमाची व्याप्ती भारतातील अनेक राज्यात पोहोचलेली असल्याने आनंद दत्तधाम आश्रमात महिन्याभरात लाखोच्या संख्येने भावीक महाप्रसाद ग्रहण करणार आहेत.

याची दखल घेऊन परभणीचे आमदार राहुल पाटील भेट दिली त्यांचे सह अरविंद काका देशमुख कृ ,ऊ, बा, सभापती  परभणी बंडू नाना बिडकर सरपंच वाडी जिल्हा परभणी प्रल्हादराव देवडे, सुनील गुडघे दिनेश बोचरे ,बबनराव रोदळे, नारायण जाधव ,एकनाथ राऊत मारुती शिंपले, प्रकाश खापरे, मधुकर शिंगुळे प्रभाकर संसारे भाऊराव पाटील हडसणीकर पुंडलिक हुंबे, सुधीर जाधव यांचे सह माहूर शहरातील व परिसरातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस, एस ,पाटील आभार प्रदर्शन विनोद भारती यांनी केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Post a Comment

Previous Post Next Post