मनीषा भुजबळ यांना “श्रमनारी रत्न” पुरस्कार जाहीर

 






नाशिक प्रतिनिधी : डॉ. शाम जाधव

नाशिक श्रमिक बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा “श्रमनारी रत्न” पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये नाशिकच्या प्रसिद्ध अभिनेत्री व नाट्यसम्राज्ञी मनीषा भुजबळ यांची निवड करण्यात आली आहे.

हा पुरस्कार सोहळा रविवार, १७ मे रोजी दुपारी ३:३० वाजता यशवंत मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात येणार आहे.

पुरस्कारासाठी निवड झालेल्या महिलांमध्ये  संगीता शिंदे,. तारा जाधव, श्रुती देशमुख, काव्या पाटील, सौ. प्रिया पाटोळे, ॲड. उषाताई पगारे, सुनंदा पाटील, भारती आवारे, लता काळे,. राधिका थेटे,वनिता बागुल,  सविता घोडके,  मनीषा जोंधळे, नेत्रा देशमुख,ज्योती आहेर,  सरला संधानशिव, शैला ठक्कर, पायल मंत्री, अंजली लाळगे, कल्पना गाजरे, मनीषा गांगुर्डे, अनिता रावल, माधुरी शिंदे, मीरा चौधरी, रत्ना बजाज, निशिगंधा कापडणीस, रेखा काकड, दिपाली गीते, रूपाली ननवरे, मंगल बाविस्कर, कविता पाटील, सोनाली तारू, अर्चना काळे, नमिता गोदने, योगिता पवार, डॉ. वैभवी पाटील आणि निकिता गायकवाड आदी कर्तृत्ववान महिलांचा समावेश आहे.

संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा वैशाली सपकाळे यांनी सर्व पुरस्कारार्थी महिलांचे अभिनंदन करताना, “महिलांनी मिळालेल्या संधीचे सोनं करून समाजात आदर्श निर्माण करावा,” असे मत व्यक्त केले. नाशिक शहरातून सर्व स्तरांतून पुरस्कारार्थी महिलांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post