सिंचन विहिरींची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

 



जिल्हा विशेष प्रतिनिधी | सुनिल धुर्वे 

यवतमाळ, प्रतिनिधी : शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरींची अपूर्ण राहिलेली कामे जुन्या मस्टरप्रमाणे पूर्ण करण्यात यावीत, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघर्ष समिती, घाटंजी यांच्या वतीने सोमवार, दिनांक 1 जून 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे आंदोलन व निवेदन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

समितीच्या वतीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरींची कामे अद्याप अपूर्ण असून त्यामुळे शेतीसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे.

आंदोलनाची माहिती :

📅 दिनांक : 1 जून 2026

🕐 वेळ : दुपारी 1.00 वाजता

📍 स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ

— शेतकरी संघर्ष समिती, घाटंजी, जि. यवतमाळ

शासनाच्या उदासीन धोरणांचा निषेध करत अपूर्ण सिंचन विहिरींची कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात येणार आहे. आपल्या हक्कासाठी व अपूर्ण राहिलेले सिंचनाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हजारो शेतकरी या आंदोलनात सहभागी होणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.



Post a Comment

Previous Post Next Post