मुन्नुरकापू, तेलंगा व बेलदार समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

 

Yavatmal Gavakadachibatmi


जिल्हा विशेष प्रतिनिधी | सुनिल धुर्वे

पांढरकवडा : मुन्नुरकापू, तेलंगा व बेलदार समाज संघटना, जिल्हा यवतमाळ यांच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा २०२६ हा कार्यक्रम जिड्डेवार भवन, पांढरकवडा येथे उत्साहात संपन्न झाला.



या कार्यक्रमास प्रा. राजूभाऊ तोडसाम यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

मार्गदर्शन करताना आमदार प्रा. राजूभाऊ तोडसाम यांनी शिक्षण हेच समाज प्रगतीचे प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या यशामुळे समाजाला नवी दिशा व प्रेरणा मिळते. विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्व, परिश्रम आणि जिद्दीच्या बळावर समाजाचे, जिल्ह्याचे तसेच राज्याचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Yavatmal News network

समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मानामुळे त्यांना अधिक प्रोत्साहन मिळत असून इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळते, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमास समाजबांधव, पालक, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post