करंजी येथील श्रीमती विमलबाई लक्ष्मण सिद्धेवार यांचे वृद्धापकाळाने निधन





गावाकडची बातमी प्रतिनिधी माहुर-किनवट

पंकज जयस्वाल, नांदेड

मो. 9421367593

आज दिनांक 26 मे रोजी करंजी येथील प्रतिष्ठित सिद्धेवार परिवारातील ज्येष्ठ सदस्या श्रीमती विमलबाई लक्ष्मण सिद्धेवार यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.

त्या अतिशय मनमिळाऊ, प्रेमळ व सामाजिक स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सिद्धेवार परिवार गावात मानाचे स्थान राखून असून त्यांच्या जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे.



त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन सुना, एक मुलगी तसेच नातवंडांचा मोठा परिवार आहे. त्यांचे पुत्र विलास लक्ष्मण सिद्धेवार व ईश्वर लक्ष्मण सिद्धेवार यांनी आईच्या निधनामुळे मोठा आधार गमावला आहे.

त्यांच्या अंत्यविधीस नातेवाईक, मित्रपरिवार तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post