Student -Amravati
जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर अमरावती
अमरावती -अमरावती शहरातील स्कूल ऑफ स्कॉलर्स निंभोरा येथे शिकत असलेल्या डॉ .रुपेश खडसे यांची मुलगी कुमारी ऋचा रुपेश खडसे ही दहावीला सी बी सी मध्ये शिकत असताना रोज नियमित अभ्यास करून तिने दहावीच्या नुकत्याच लागलेल्या सी बी एस सी च्या निकालामध्ये 95 टक्के मिळवले आहे त्यामुळे ह्या तिच्या निकालामुळे शाळेमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे तिने आपल्या केलेल्या मेहनतीने अभ्यासाने जिद्दीने केलेला विश्वास आई-बाबाच्या स्वप्न साकार करण्यासाठी तिने दहावीच्या परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास करून 95% बनवले आहेत.
याचे श्रेय सर्वप्रथम ती तिचे वडील डॉक्टर रुपेश खडसे, पुनम रुपेश खडसे तसेच शाळेचे प्राचार्य डॉ. संतोष कुमार शाळेचे शिक्षक मयूर नाकडे, दिपाली पवार ,कृष्णा बोराडे, शितल जाधव, सुरेंद्र शिरसाट, रश्मी बजाज ,अर्चना पाटील यांनी खूप मेहनत घेऊन तिला शिकवले त्यामुळे ऋचा रुपेश खडसे हिने यांना आपले गुरु मानून त्यांचे आभार मानले आहे व पुढे बारावी मध्ये सुद्धा 99 टक्के मिळवण्याची आत्मविश्वास तिने दाखवला आहे आणि सर्व मुलींनी आपण शिकावं व आपल्या आई वडिलांचे नाव व आपल्या कुटुंबाचे नाव कमवावे व देशाची प्रत्येक महिला ही अग्रेसर राहो असे तिने आपले मत व्यक्त केले.

