Gavakadachibatmi network
श्रीदत्त शिखर संस्थानवर ब्रह्मलीन झालेले प. पू. प. महंत मधुसूदनजी भारती महाराज यांचे प्रित्यर्थ दि. 19 एप्रिल रोजी षोडशी पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. या महापूजेसाठी आचार्य महामंडलेश्वर प. पू. अवधेशानंदजी गीरी महाराज (जुना आखाडा तथा कुंभमेळा प्रमुख ), महामंत्री प. पू. श्री हरी गीरी जी महाराज, प. पू. श्री प्रेम गीरीजी महाराज, सभापती प. पू. श्री मोहन शास्त्रीजी महाराज आदींची उपस्थिती लाभणार आहे. लाखों भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीदत्त शिखर संस्थानच्या आयोजन समितीने दि. 10 एप्रिल रोजी सायं. 5 वा. घेतलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे.
श्रीदत्त शिखर संस्थानचे ब्रह्मलीन महंत प. पू. प. मधुसूदनजी भारती महाराज हे शनिवार दि. 4 एप्रिल रोजी वैकुंठवासी झाले होते. अनेक साधू, संत, महंत आणि लाखों भक्तांच्या उपस्थितीत त्यांना रविवारी निरोप दिला गेला, त्यांचेनंतर डॉ. धनेश्वरजी भारती गुरु मधुसूदनजी भारती महाराज हे परंपरागत गादीवर विराजमान झाले. त्यांचे मार्गदर्शनात हा षोडशी कार्यक्रम संपन्न होणार आहे.
पूजनीय महंत महाराज यांच्या दालनात घेण्यात आलेल्या पत्र परिषदेत संस्थानचे सचिव गणेश ठेंगे पाटील, व्यवस्थापक जी. एन. नाईक व प. पू. बाळू महाराज काकाणी यांनी कार्यक्रमांची रूपरेषा सांगतांना दि. 19 एप्रिल रोजी स. 6 वा.तीर्थ स्थापना व दत्त नामाचा गजर, स. 10 ते 12 पर्यंत सत्संग, यासाठी महामंडलेश्वर अवधेशानंद गीरीजी महाराज हे प्रमुख मार्गदर्शक असणार आहेत,दु. 12 पासून षोडशी महापूजा आणि महाप्रसाद, सायं. 8 वा. पासून आनंद दत्त 128 सव्वाखंडी महापूजा व दि. 20 एप्रिल रोजी सकाळी काकडा आरतीने या पूजेची सांगता होणार आहे अशी माहिती दिली.

