गावाकडची बातमी| जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा येथे प्रवेशोत्सोव कार्यक्रम

 


विद्यार्थ्यांचे माझे शाळेतील पहिले पाऊल विद्यार्थ्यांचे पायाचे ठसे घेऊन हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.



Gavakadachibatmi,निलेश रामगावकर जिल्हा प्रतिनिधी 


 तळेगाव दशासर :- स्थानिक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक 17 एप्रिल 2026 दशासर येथे सन २०२६-२७ करिता विद्यार्थिनींना प्रवेश देण्याच्या दृष्टीने प्रवेशोत्सव हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. याप्रसंगी तळेगाव दशासर केंद्राचे केंद्रप्रमुख ठाकरे साहेब तसेच शाळेचे मुख्याध्यापक सचिन चव्हाण व शाळेतील सहाय्यक शिक्षिका अर्चना जगताप तसेच संगीता पुनसे, हेमलता राऊत, भाग्यश्री घोंगडे, संध्या राठोड शिक्षिका या कार्यक्रमाला उपस्थित होत्या , तसेच या नवीन सत्रांमध्ये प्रवेश घेतलेले वर्ग पहिलीच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या. या कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांचे माझ्या शाळेतील पहिले पाऊल हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या पावलाचे ठसे घेऊन तसेच शिक्षकांद्वारे त्यांचे स्वागत करण्यात आले. आणि विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली .अशा प्रकारे प्रवेशोत्सव हा कार्यक्रम शाळेमध्ये साजरा करण्यात आला.












Post a Comment

Previous Post Next Post