माजी पोलीस उपनिरीक्षक मनोहर वानखडे यांचा “समाजरत्न” पुरस्काराने गौरव

 



धम्मप्रसार व समाजप्रबोधनातील उल्लेखनीय कार्याची दखल



Editor- Milind jamnik 

बुलढाणा - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रस्ट, बोथाकाजी ता. खामगाव जि. बुलढाणा यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात माजी पोलीस उपनिरीक्षक तथा बुद्धविहार समन्वय महासंघ, अकोला चे उपाध्यक्ष मनोहर वानखडे यांना त्यांच्या सामाजिक व धम्मप्रसाराच्या कार्यासाठी “समाजरत्न” पुरस्काराने गौरविण्यात आले.

दि. १७ एप्रिल २०२६ रोजी पार पडलेल्या या सोहळ्यात वानखडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “प्रत्येक रविवारी विहारात जावे” या संदेशाचा प्रसार करत विविध विहारांमध्ये जाऊन जनजागृती केली असल्याचे नमूद करण्यात आले. समाजातील अंधश्रद्धा व चुकीच्या रूढींविरोधात त्यांनी प्रभावी भूमिका घेतली असून, बौद्ध समाजातील विवाहासंबंधी गैरसमज दूर करण्यासाठीही त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.



धम्मज्ञान परीक्षा व विविध समाजप्रबोधनात्मक उपक्रमांद्वारे समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याच्या त्यांच्या कार्याची दखल घेत ट्रस्टचे अध्यक्ष पी. जे. हिवराळे सर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संतोष  हिवराळे व सदानंद  हिवराळे यांचे सहकार्य लाभले. या प्रसंगी परिसरातील नागरिक व बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment

Previous Post Next Post