लेबर कॉलनी, कृषीनगर येथील बुद्ध विहारात संविधान विषयक जनजागृती; स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग
Editor Milind jamnik
अकोला - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त लेबर कॉलनी, कृषीनगर, अकोला येथील बुद्ध विहार समितीच्या वतीने तसेच बुद्ध विहार समन्वय महासंघ व बुधवार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान या विषयावर धम्मज्ञान परीक्षेचे आयोजन 17 एप्रिल 2026 रोजी करण्यात आले. कार्यक्रमात नृत्य स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धाही घेण्यात आल्या.
धम्मज्ञान परीक्षेत छाया धनराज जाधव (धम्मदरा बुद्ध विहार, भीमनगर) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक लता तेजराव वाकोडे (अष्टशीला महिला संघ, लेबर कॉलनी कृषीनगर) तर तृतीय क्रमांक राणी किरण आठवले यांनी मिळविला.
नृत्य स्पर्धेत ग्रुप डान्स प्रकारात रिद्धी सरदार व ईशानी गोपनारायण यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. वक्तृत्व स्पर्धेत वेदश्री पुरुषोत्तम सनगडे यांनी प्रथम क्रमांक पटकावून आपली वक्तृत्वकला सादर केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवराव अहिर,अध्यक्ष, बुद्ध विहार समिती, लेबर कॉलनी होते. प्रमुख पाहुणे म्हणून धम्मबोधी डोंगरे सर, समाजसेवक विलास इंगोले, अॅड. अजय गवई, अॅड. बुद्धभूषण गोपनारायण, भारतीय बौद्ध महासभेचे माजी अध्यक्ष गौरवनाथ वानखडे, संघटक मधुकरराव लबडे, पीएसआय गणेश जिंजर,सामाजिक कार्यकर्ते गजानन हरणे, माणिकरावजी पत्रिका, अवधूतरावजी खडसे, मंगेश सावंत (हिंगणा) व प्रवीण गवई आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी पोलीस उपनिरीक्षक मनोहर वानखेडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन बाळू अहिर यांनी मानले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीम युवक व्यायामशाळा व राष्ट्रशील आम्हाला संघ यांच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.




