श्री गुरुदेव सर्वांगीण बाल सुसंस्कार निवासी शिबिर
जिल्हा प्रतिनिधी निलेश रामगावकर
अमरावती/ अंजनसिंगी :- अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ, गुरुगंज मोझरी यांच्या तत्व प्रणालीनुसार मदर टेरेसा न्यू इंग्लिश सायन्स कॉलेज, अंजनसिंगी द्वारा आयोजित श्री गुरुदेव सर्वांगीण बाल सुसंस्कार निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून शिबिरातील उपक्रम:- ध्यान व प्रार्थना, लाठी काठी, मलखांब ,दांडपट्टा, बौद्धिक प्राणायाम, कराटे, लेझीम, भजन/श्लोक योगासन इत्यादी प्रकारचे उपक्रम राबविण्यात येणार असून हा कार्यक्रम दिनांक 27 एप्रिल ते पाच मे 2026 पर्यंत राहणार आहे. तरी जास्तीत जास्त प्रतिसाद देण्यासाठी अध्यक्ष प्रमोद नंदकिशोर कुर्जेकर ( अध्यक्ष श्री संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय विकास संस्था यांच्या वतीने करण्यात आले आहे.

