Editor Milind jamnik
मूर्तिजापूर – अकोला पोलीस दलाकडून राबविण्यात येत असलेल्या “ऑपरेशन प्रहार” अंतर्गत माना पोलीसांनी अवैध खर्रा निर्मिती व गुटखा विक्रीविरोधात मोठी कारवाई करत कुरुम येथे छापा टाकला. या कारवाईत तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून एकूण 1,01,383 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई 18 एप्रिल 2026 रोजी करण्यात आली. कुरुम गावात प्रतिबंधित खर्रा तयार करून गुटखा व पान मसाल्याची विक्री सुरू असल्याची गुप्त माहिती माना पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ छापा टाकत आरोपींना रंगेहात पकडले.
या प्रकरणात अजहर शहा जफर शहा (वय 39), आनंद भगवान सावळे (वय 29) आणि इर्शाद हुसेन शहा जफर हुसेन (वय 28) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या ताब्यातून खर्रा बनविण्याची सुमारे 25 हजार रुपये किमतीची विद्युत मशीन तसेच सुगंधित तंबाखू, पान मसाला आणि गुटखा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल असा एकूण 76,383 रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
सदर प्रकरणी माना पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 165/2026 नोंदविण्यात आला असून अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलिस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली माना पोलीस ठाण्याचे ठाणेदार गणेश नावकार, पो.उपनिरीक्षक गणेश महाजन,पो.हे.कॉ. उमेश हरमकर, पो.हे.कॉ. मंगेश घाटे,पो.कॉ. पंकज वाघमारे, पो.कॉ. आकाश काळे तसेच अन्न व औषध प्रशासनचे रवींद्र द्वारकादास सोळंके (अन्न सुरक्षा अधिकारी) यांनी केली.व त्यांच्या पथकाने तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरीत्या केली.अकोला पोलीस दलाने नागरिकांना आवाहन केले आहे की, आरोग्यास अपायकारक व बेकायदेशीर पदार्थांविरोधात माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करावे.
