ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणाचा निषेध — बुद्धविहाराजवळ अजूनही नालीतील घाण साचलेली!
जामनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे दि. २८ एप्रिल २०२६ रोजी भीमजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याची तयारी सुरू आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देशभरात स्वच्छता, समता आणि मानवतेचा संदेश दिला जात असताना, टाकरखेडा गावात मात्र ग्रामपंचायतीचा निष्काळजीपणा उघडकीस आला आहे.
गावातील नाल्यांची साफसफाई करून काढलेली घाण आणि माती अद्यापही बुद्धविहाराजवळ ढिगाऱ्याच्या स्वरूपात पडून आहे. यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे, बाबासाहेबांच्या जयंतीसारख्या महत्त्वाच्या दिवशीही प्रशासनाने या ठिकाणाकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांनी तात्काळ ही घाण हटवून परिसर स्वच्छ करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशीही मागणी जोर धरत आहे.
“स्वच्छतेचे केवळ दिखावे नकोत, प्रत्यक्ष कृती हवी!” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
आता तरी प्रशासनाने जागे होऊन बुद्धविहार परिसर स्वच्छ करावा, अशी सर्वसामान्यांची ठाम मागणी आहे.
Tags : #नालीतील घाण अजूनही तशीच, #दुर्गंधीमुळे नागरिक हैराण,#स्वच्छतेचे नारे फक्त दिखावा,#घाणीचे साम्राज्य,#गलिच्छ कारभार,#healthyvillage #mission india,#nirgogigaavsamruddhgaav,#ruralhealthawarenessprogram, #publichealthmaharashtra


