शिर्डीत ‘महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार २०२६’ – लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार नोंद

 



शिर्डी (प्रतिनिधी – डॉ. शाम जाधव)

ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी. फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पातळीवरील भव्य व दिव्य ‘महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार २०२६’ सोहळ्याचे आयोजन शिर्डीत करण्यात आले आहे.

हा सोहळा दि. २ मे २०२६ (शनिवार) रोजी सकाळी ९:३० वाजता परिवार लॉन्स अँड बॅंकेट हॉल, न्यू रिंग रोड, सिटी मार्केट शेजारी, इंडियन पेट्रोल पंप जवळ, शिर्डी येथे पार पडणार आहे.



या भव्य सोहळ्यात महाराष्ट्र राज्यातील २७५ मान्यवरांना ३६ विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘महाराष्ट्र साई पद्मश्री पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे, इतक्या मोठ्या प्रमाणावर मान्यवरांचा सन्मान करणारा हा उपक्रम पहिल्यांदाच होत असून, त्यामुळे या सोहळ्याची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणार असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे.

या कार्यक्रमासाठी समितीतील सर्व सदस्य मोठ्या उत्साहाने व मेहनतीने कार्यरत असून, प्रमुख पदाधिकारी पुढीलप्रमाणे आहेत.

अध्यक्ष – सुदाम संसारे,उपाध्यक्षा –  विद्या ठाकुर/कुंजिर

सल्लागार – डॉ. माधव वानखडे,कार्याध्यक्ष – राजेश काळे

सरचिटणीस – भुषण सरदार, समाधान बिथरे,संयोजक – विशाल पवार, सागर बैरागी, गणेश काळे,स्वागताध्यक्षा – राजनंदिनी अहिरे व सहकारी प्रसिद्धी प्रमुख – रामभाऊ आवारे, वजीर शेख, डॉ. शाम जाधव आदी

हा पुरस्कार सोहळा मान, सन्मान, प्रतिष्ठा व श्रद्धेचा एक अनोखा संगम ठरणार असून, भविष्यात असा भव्य सोहळा पुन्हा होणे कठीण असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.


Maharashtra Sai Padmashri Award 2026 Shirdi Event News Limca Book Record Maharashtra Sai Award Ceremony Maharashtra News Shirdi Latest News Award Ceremony India Marathi News


Post a Comment

Previous Post Next Post