निलेश रामगावकर/जिल्हा प्रतिनिधी
धामणगाव रेल्वे :- आज दि. 9 एप्रिल गुरुवार रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र निंबोली अंतर्गत आश्रम शाळा हिंगणगाव येथे एच पी व्ही लसीकरणाबाबत मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थी पालक वर्ग तसेच शिक्षक वर्ग उपस्थित होते.
समुपदेशन केल्यानंतर तीन पालकांनी आपल्या पाल्यांना लसीकरण करण्याबाबत संमती पत्र दिले. त्यानंतर त्या विद्यार्थिनींना प्राथमिक आरोग्य केंद्र निंबोली येथे लसीकरण करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे नियोजन डॉक्टर महेश लादे वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत करण्यात आले. सदर कार्यक्रमाला तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विवेक सुदेवाड उपस्थित होते. व उर्वरित पालकांना सुद्धा त्यांच्या पाल्याचे लसीकरणाबाबत समुपदेशन करण्यात आले.

