महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या लाखपुरीत ; महाराजस्व समाधान शिबिराला विशेष उपस्थिती

 



लक्षेश्वर संस्थान येथे विविध शासकीय सेवा एकाच छताखाली ; नागरिकांच्या तक्रारींचा होणार तत्काळ निपटारा


Editor Milind jamnik 

मूर्तिजापूर - तालुक्यातीत लाखपुरी येथील लक्षेश्वर संस्थान येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र. 1” अंतर्गत विशेष महसूल शिबिराचे आयोजन दि. 10 एप्रिल रोजी  सकाळी 10 ते 4 वेळेत करण्यात आले आहे. या होणाऱ्या या शिबिरात विविध शासकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या शिबिराला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे भेट देणार असून, शेतकरी व नागरिकांच्या महसूल विषयक प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करण्यावर भर दिला जाणार आहे.

शिबिरात महसूल विभागासह पुरवठा विभाग, संजय गांधी योजना, महिला व बाल विकास, महावितरण, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, आरोग्य विभाग, सेतू केंद्र, आधार सेवा, महिला बचत गट, दुय्यम निबंधक कार्यालय, भूमी अभिलेख आणि तक्रार निवारण कक्षाचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत.नागरिकांना डिजिटल सेवा, ई-फेरफार, ई-मोजणी, अभिलेख दुरुस्ती, विविध प्रमाणपत्रांचे वितरण तसेच महसुली मार्गदर्शन या सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळणार असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post