जागतिक महिला दिनानिमित्त नारी शक्ती सन्मान सोहळाचे आयोजन






 नाशिक -: श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार संस्था बालाजी कोर्ट, तसेच श्रीक्षेत्र नासिक श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार संस्था श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर व नासिक रोड यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे व स्त्री शक्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. नासिक येथील सुदर्शन लॉन्स वडाळा पाथर्डी रोड इंदिरानगर या ठिकाणी दिनांक 31 मार्च 2016 रोजी सायंकाळी पाच ते आठ या वेळेत सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. अँड विनया अमित नागरे तसेच सौ. नारायण देविदास नागरे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनावरून सदर कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे. कार्यक्रमासाठी विशेष व मोलाचे सहकार्य मयूर अलंकार चे श्री मयुर राजेंद्र शहाणे,माळवी ग्रुप श्री.विवेक मालवी, मंडलिक बंधू सराफ श्री.संजय मंडलिक त्याचप्रमाणे त्रिशिका ज्वेलर्स चे श्री गोपाळ कुलथे, स्कॅन गोदरेज, श्री मेक ओव्हर, नेचर विस्क, स्पायरो पावर स्पिरूलीना , सक्षम मीडिया फाउंडेशन व सक्षम पोलीस टाईम याचे सर्वांचे मुलाचे सहकार्य लाभलेले आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मा.सौ. करून डहाळे, उपायुक्त धुळे महानगरपालिका, मा.सौ. संगीता नांदुरकर उपायुक्त नाशिक महानगरपालिका, तसेच .मा.सौ. रूपाली शिरोडे. हे प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत, विशेष उपस्थिती सौ.मेघा शिंपी,मनुमानसी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष, त्याचप्रमाणे अँड एकता कदम युनिटी फाउंडेशन अध्यक्ष, सौ.निशिगंधा कापडणीस,सौ सोनाली थोरात हे सर्व उपस्थित राहणार आहेत. समाजातील महिला या स्वतःच्या कलागुणांना चालना न देता फक्त संसार आणि जबाबदारी यातच गुरफडत जात आहे आणि करियर यामुळे देखील स्वतःसाठी जगता येत नाही म्हणून खास महिलांनी स्वतःसाठी जगावे व एक दिवस स्वतःच्या छंद झोप असावे यासाठी त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सदस्य कार्यक्रमाचे आयोजन अँड विनया नागरे व सौ नारायणी नागरे यांनी केले आहे. तरी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी या सुंदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचे देखील व्यवस्था केलेली आहे तरी सर्वांनी कार्यक्रम बघण्यासाठी व एन्जॉयमेंट करण्यासाठी नक्की यावे.

Post a Comment

Previous Post Next Post